Game Jihad : आता संगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न

123

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

ऑनलाइन गेमद्वारे मुलांचे धर्मांतर करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शाहनवाज खान उर्फ बड्डो याला अटक केली. शाहनवाज खान हा या रॅकेटचा म्होरक्या आहे. अशातच आता तरुणाईला वेड लावणाऱ्या पबजी गेमच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी एका मुस्लीम इसमाला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे. अक्रम शाहाबुद्दिन शेख असे आरोपीचे नाव आहे.

संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर इथल्या एका 22 वर्षीय पीडित तरुणीशी अक्रम शाहाबुद्दिन शेख याने पबजी बिजीएमआय गेमच्या माध्यमातून ओळख केली होती. हा आरोपी मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर येथील रहिवासी आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हा देखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला आहे.

(हेही वाचा Wari Jihad : वारी जिहाद : वारकऱ्यांच्या तोंडून वदवले ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’, पंढरीच्या वारीत धर्मांतराचा प्रयत्न?)

अक्रम शाहाबुद्दिन शेखने पबजी गेमच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तरूणीला भेटण्यासाठी थेट संगमनेर गाठले होते. तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निवांत जागेत घेऊन गेला. काहीतरी चुकीचे घडत आहे हे पीडित तरुणीच्या लक्षात येताच ती घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपी अक्रम पीडित तरुणीसोबत बळजबरी करायला लागला आणि आपण बिहारला जाऊ लग्न करू असे सांगायला लागला. तरुणीने पळण्याचा प्रयत्न करताच तुझे व्हिडिओ बनवून मारून टाकू, अशी धमकी अक्रम आणि त्याच्या मित्राने दिली.

त्यानंतर तरुणीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्रमला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये तो अनेक हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पब्जी गेम खेळण्याच्या माध्यमातून मुलींची मैत्री करून धर्मांतरण करण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक निष्कर्षामध्ये समोर येत आहे. या मुलाने आतापर्यंत किती मुलींना फसविले याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.