हृदयविकारामुळे का होतोय दर ५५ मिनिटांनी एकाचा मृत्यू?

148
हृदयविकारामुळे का होतोय दर ५५ मिनिटांनी एकाचा मृत्यू?
हृदयविकारामुळे का होतोय दर ५५ मिनिटांनी एकाचा मृत्यू?

काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना क्वचित कानावर यायच्या. त्यात सुद्धा मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वृद्धांचे प्रमाण जास्त असायचे. आता हे चित्र अधिकाधिक चिंताजनक बनते आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमावणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही काळात वाढले आहेच पण त्यासोबतच मृतांच्या आकड्यातील तरुणांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

२०२२ मध्ये दर ५५ मिनिटांनी एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच दिवसाला २६ जणांचा प्राण हृदयविकाराच्या झटक्याने घेतला. २०१९ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ५८५९ लोकांचा प्राण घेतला तर २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ५५५४ लोकांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे

२०२२ मध्ये विविध आजारांमुळे ९७,५३८ जणांचा मृत्यू झाला. मूत्रपिंड, यकृत निकामी, ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज, टीबी, कर्करोग या आजारांमुळे हजारो जणांनी प्राण गमावले. पण धक्कादायक बाब ही आहे की सर्व आजारांपेक्षा हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. २०२२ मध्ये मुंबई जिल्ह्यातल्या ९४७० जणांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे प्राण गमावला.

तरुण अग्रेसर

लीलावती रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉ. पवन कुमार म्हणाले की, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एका दशकापूर्वी, १ किंवा २ टक्के तरुण गटांमध्ये हृदयविकाराचा झटका आढळून आला होता. पण आता तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

दोष कोणाच्या माथी

पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार

पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने नानाविध दुर्धर विकारांना आमंत्रण दिले आहे. अवेळी खाणे तसेच मर्यादे पलीकडचे तेलकट तसेच तिखट खाण्यामुळे शरिराचे संतुलन बिघडले.

वायू प्रदूषण

जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांना मागे टाकत मुंबईने वायू प्रदूषणात दुसरा नंबर मिळवला आहे. या प्रदूषित हवेच्या श्वसनामुळे हृदयाला हानी पोहोचते.

धूम्रपान

फॅशन म्हणून ध्रुम्रपान करण्याचा ट्रेंड तरुणाईत रुळतो आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसांवर दूरगामी नकारात्मक परिणाम होतात.

अस्वस्थ जीवनशैली

कोरोना काळापासून घरून काम करण्याची पद्धत देशभरात रूजू झाली. घरून काम करण्याचे फायदे सांगतांना तरुणाई थकत नाही. पण वर्क फॉर्म होममुळे दिवसभर घरी बसून राहावे लागते. कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही.

व्यायाम ठरतो प्राणघातक

सायन रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रा म्हणाले की, दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ते बैठी जीवनशैली जगतात. अपुरी झोप, तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार आणि तणाव ही हृदयविकाराची कारणे आहेत. त्यांनी सांगितले की बऱ्याच रुग्णांमध्ये करिअरशी संबंधित तणाव होता. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती जी कोणत्याही देखरेखीशिवाय व्यापक व्यायाम करते जी कधीकधी प्राणघातक ठरते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.