Health Tips : गाढ झोपेसाठी करा ‘हे’ सोपे उपाय !

140
Health Tips : गाढ झोपेसाठी करा 'हे' सोपे उपाय !
Health Tips : गाढ झोपेसाठी करा 'हे' सोपे उपाय !

झोप ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. (Health Tips) अपुऱ्या झोपेमुळे आजार जडण्याची शक्यता असते. गाढ झोप लागली, तर दिवसाची सुरुवातही उत्साहात होते. आरोग्य सुधारायला मदत होते. जाणून घेऊया, गाढ झोपेसाठी काही सोप्या उपाय पद्धती –

झोपण्यापूर्वी काय कराल
झोपण्यापूर्वी, दिवसभरात आपण काय शिकलो. याचं चिंतन-मनन करा. आपल्या मनातले विचार आणि भावना यावर नियंत्रण मिळवण्याचा हा एक फायदेशीर मार्ग आहे. दिवसभरात तुम्ही काय साध्य केले, काय शिकलात आणि कोणती आव्हाने स्वीकारलीत ते लिहा. दिवसभरात घडलेल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा. यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होईल.

स्क्रीनटाइम कमी करा
आजच्या डिजिटल युगात, आपल्यापैकी बरेच जण झोपेपर्यंत आपल्या स्मार्टफोन्स, टॅब्लेट किंवा लॅपटॉपवर स्क्रोल करत असतात. स्क्रीनमधून येणार निळा प्रकाश तुमच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो. झोपण्याच्या वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे ते एक तास आधी स्क्रीन बाजूला ठेवा. त्याऐवजी, पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा योग यासारख्या शांत क्रियाकलापांमध्ये गुंतण्यासाठी हा वेळ वापरा.

(हेही वाचा – Ravindra Waikar : आमदार रवींद्र वायकर यांची ६ तास चौकशी, वायकर यांच्या पत्नीलाही समन्स जारी)

उद्याची तयारी करा
उद्याची तयारी आदल्या दिवशीच करा. यासाठी काही मिनिटे वेळ काढा. उद्या घालायचे कपडे आधीच काढून ठेवा. दुपारचे जेवण आणि कामाची यादी तयार करा. सकाळी करायच्या कामांची यादी तयार करा. यामुळे कामाचा ताण कमी होऊन दिवस उत्तम जाईल.

योगासने, प्राणायाम
रात्री गाढ झोपेसाठी झोपण्यापूर्वी आराम करणे महत्त्वाचे आहे. योगासने, प्राणायाम यांचा सराव करा. यामुळे मन शांत राहिल. तणाव कमी होईल. गरम पाण्याने आंघोळ, आयुर्वेदिक चहा घेतल्याने विश्रांती मिळायला सोयीचे जाईल.

झोपण्याची वेळ निश्चित करा
नियमित झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करा. दररोज झोपण्या-उठण्याची वेळ ठरवा. यामुळे गाढ झोप लागायला मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.