Moto G71s : मोठा डिस्प्ले आणि सुधारित कॅमेरासह मोटोरोला कंपनीचा मोटो जी७१एस बाजारात

मोबाईल फोन क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली असताना मोटोरोला या जुन्या मोबईल कंपनीने आपल्या जी सीरिजमधील सुधारित फोन फारसा गाजावाजा न करता बाजारात आणला आहे.

104
Moto G71s : मोठा डिस्प्ले आणि सुधारित कॅमेरासह मोटोरोला कंपनीचा मोटो जी७१एस बाजारात
Moto G71s : मोठा डिस्प्ले आणि सुधारित कॅमेरासह मोटोरोला कंपनीचा मोटो जी७१एस बाजारात
  • ऋजुता लुकतुके

मोबाईल फोन क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली असताना मोटोरोला या जुन्या मोबईल कंपनीने आपल्या जी सीरिजमधील सुधारित फोन फारसा गाजावाजा न करता बाजारात आणला आहे. मोटोरोला ही मोबाईल बनवणारी एक जुनी कंपनी आहे. नवीन मोबाईल कंपन्यांच्या भाऊगर्दीत या कंपनीने नवनवीन मॉडेल बाजारात आणून आपला हिस्सा टिकवून ठेवला आहे. आताही आपल्या जी सीरिजमध्ये त्यांनी सुधारणा करुन मोटो जी७१एस हा नवीन फोन बाजारात आणला आहे. (Moto G71s)

मोटो जी७१ या आधीच्या फोनच्या तुलनेत या फोनचा डिस्प्ले आणि कॅमेरा सुधारित आहे. शिवाय स्टोरेजही वाढलंय. फोनचा प्रोसेसर मात्र जुनाच आहे. या नवीन फोनची किंमत १९,५०० रुपये इतकी असेल आणि ही या फोनची जमेची बाजू असेल. कारण, मिड-रेंज बाजारपेठेतही ही किंमत स्पर्धात्मकरित्या कमी आहे. (Moto G71s)

(हेही वाचा – Nashik News : नाशिकहून तब्बल १३ प्रमुख शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु, कोणत्या शहरांचा असणार समावेश)

वर म्हटल्याप्रमाणे या फोनचा डिस्प्ले आता ६.६ इंचांचा आहे. आधीच्या फोनमध्ये तो ६.४ इंच इतका होता. नवीन फोनमध्ये व्हीडिओ पाहण्याचा अनुभव आधीपेक्षा चांगला असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. मोबाईलमधील प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आहे. चीनमध्ये हा फोन आधीच उपलब्ध झाला होता. तिथे या फोनला मागणीही होती. आधीच्या फोनच्या तुलनेत या फोनची बॅटरी आणि प्रोसेसर बदलण्यात आलेला नाही. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला हा फोन आहे. हा फोन अँड्रॉईड ११ या प्रणालीवर चालतो. चंदेरी, काळा आणि पांढऱ्या रंगात हा फोन उपलब्ध असेल. (Moto G71s)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.