Hero Xpulse 400 : हीरोच्या या ॲडव्हेंचर बाईकची किंमत ठाऊक आहे?

भारतात आता येणाऱ्या काळात जास्त क्षमतेच्या आणि अवघड प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या बाईक बाजारात आणण्याची अहमहमिकाच लागली आहे.

22
Hero Xpulse 400 : हीरोच्या या ॲडव्हेंचर बाईकची किंमत ठाऊक आहे?
Hero Xpulse 400 : हीरोच्या या ॲडव्हेंचर बाईकची किंमत ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

हीरो मोटर्स या दुचारी उत्पादक कंपनीची महत्त्वाकांक्षी हीरो एक्सपल्स ४०० ही बाईक आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती लोकांसमोर येऊ शकेल. पण, तिची किंमत ऐकली आहे का? (Hero Xpulse 400)

भारतात आता येणाऱ्या काळात जास्त क्षमतेच्या आणि अवघड प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या बाईक बाजारात आणण्याची अहमहमिकाच लागली आहे. रॉयल एनफिल्ड ही या क्षेत्रातील दिग्गज कंपनी. रॉयल एनफिल्ड तर एक सोडून दोन नवीन ॲडव्हेंचर बाईक बाजारात आणणार आहे आणि त्याला स्पर्धा करणारी एक बाईक हीरो कंपनी तयार करत आहे. हीरो एक्सपल्स ४०० ही ती बाईक आहे आणि पुढील वर्षी ऑक्टोबर पर्यंत ती बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. (Hero Xpulse 400)

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिका एसएमएस सेवांवरच करते एवढे कोटी रुपये खर्च)

त्यानंतर रॉयल एनफिल्ड स्क्रॅम व हिमालयन या दोन बाईक, सुझुकी व्ही स्टॉर्म एसएक्स, ओला ॲडव्हेंचर आणि हीरो एक्सपल्स ४०० अशा बाईकमध्ये स्पर्धा सुरू होईल. हीरो कंपनीने काही वर्षांपूर्वीच ॲडव्हेंचर बाईक क्षेत्रात शिरकाव करण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता आणि अशा बाईकची छोटीशी झलकही दाखवली होती. (Hero Xpulse 400)

४०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. तिचं पुढचं चाक २१ इंच घेराचं असेल. एलईडी हेडलाईट आणि लाँग ट्रॅव्हल सस्पेन्शनची सुविधाही यात असेल असा अंदाज आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीला ही बाईक बाजारात आणायची आहे. तिची सुरुवातीची किंमत २,७०,००० रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज आहे. (Hero Xpulse 400)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.