Hero Xtreme 400S : हीरो कंपनीची ही नवीन प्रिमिअम बाईक पाहिली का?

एक्सट्रीम ही सुपरस्पोर्ट श्रेणीतील बाईक असणार आहे

88
Hero Xtreme 400S : हीरो कंपनीची ही नवीन प्रिमिअम बाईक पाहिली का?
Hero Xtreme 400S : हीरो कंपनीची ही नवीन प्रिमिअम बाईक पाहिली का?
  • ऋजुता लुकतुके

हीरो कंपनी यावर्षी आपल्या काही प्रिमिअम बाईक बाजारात आणत आहे. यातील दोन महत्त्वाच्या आहेत हीरो एक्स्ट्रीम आणि हीरो एक्सपल्स. यातील एक्सट्रीम विषयी जाणून घेऊया.

हीरो एक्सट्रीम आणि हीरो एक्सपल्स या हीरो कंपनीच्या दोन महत्त्वाकांक्षी बाईक येत्या काही दिवसांमध्ये लाँच होणार आहेत. अलीकडेच त्या टेस्टड्राईव्ह करत असतानाचे काही फोटो लीक झाले आहेत. आणि त्यामध्ये या बाईकचा स्टायलिश तसंच स्पोर्टी लूक लोकांसमोर आला आहे.

एक्सट्रीम ही सुपरस्पोर्ट श्रेणीतील बाईक असणार आहे. एक्सपल्स प्रमाणेच या गाडीचं इंजिनही ४२१ सीसी क्षमतेचं असेल. हीरो करिझ्मा झेडआर सारखेच फिचर या गाडीचे असतील, असा अंदाज आहे. पण, चेहरामोहरा मात्र एखाद्या स्पोर्ट बाईकला साजेल असा आहे.

एक्सपल्स आणि एक्सट्रीम गाड्यांचं इंजिन सारखंच आहे. पण, एक्सट्रीममध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉक देण्‌यात आले आहेत. त्यामुळे बाईकची किंमत आटोक्यात ठेवायला कंपनीला मदत मिळेल. बाईकला अलॉ. व्हील्स आणि क्लिपऑन हँडलबार देण्यात आले आहेत. बाईकचा डिस्प्ले डिजिटल असेल. आणि तिथे गाडीचे सगळे कंट्रोलही असतील.

या गाडीची अंदाजे किंमत २.५ लाख रुपये इतकी असेल. आणि लाँच झाल्यावर गाडीची स्पर्धा टीव्हीएस अपाचे आरआर३१०, बीएमडब्ल्यू जी३१० आरआर आणि केटीएम आरसी३९० या बाईकशी असेल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.