Crime News : सोन्याच्या कारखान्यावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना अटक

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यावर दरोडा घालून लाखो रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिल्ली आणि पालघर येथून अटक करण्यात आली आहे.

91
Crime News : सोन्याच्या कारखान्यावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना अटक
Crime News : सोन्याच्या कारखान्यावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना अटक

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या सोन्याचे दागिने बनविण्याच्या कारखान्यावर दरोडा घालून लाखो रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दिल्ली आणि पालघर येथून अटक करण्यात आली आहे. (Crime News)

राजेश राय आणि वसंत राजू दावअण्णा पेल्ली उर्फ चिंटू (४३) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही दरोडेखोरांची नावे आहे. पोलिसांनी या दोघांजवळून लुटलेले ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तुल आणि चाकू हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती लो. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली. काळबादेवी येथील खंडेलवाल सदन या ठिकाणी असलेल्या सोन्याचे दागिने तयार करण्याच्या कारखान्यात ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोन शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश करून तेथील कामगारांना पिस्तुल आणि शस्त्राचा धाक दाखवून कामगारांना मारहाण केली आणि कारखान्यातील साडेसात लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पोबारा केला होता. (Crime News)

(हेही वाचा – Poshan Pack: गरिबांच्या आरोग्यासाठी ‘पोषण पॅक’; ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन’ संस्थेचा अभिनव उपक्रम)

या प्रकरणी लो. टी. मार्ग पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लो. टी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि.सुशील कुमार वंजारी, पोउनी. चिंतामणी जाधव आणि पथक यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन दरोडेखोरां पैकी राजेश राय याची ओळख पटविण्यात आली. राजेश राय हा दिल्ली येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळताच पोलीस पथकाला दिल्लीला रवाना करण्यात आले. (Crime News)

दिल्ली येथे पोलीस पथकाने राजेश राय वर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले व त्याला अटक करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराची माहिती काढण्यात आली असता तो राजू पेल्ली हा पालघर जिल्ह्यातील एका ठिकाणी दडून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजू पेल्ली उर्फ चिंटू याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वपोनि. ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली. या दोघांजवळून पोलिसांनी लुटलेले दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आले असल्याचे वाघ यांनी सांगितले. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.