Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आततायीपणा

लोअर परळ डिलाईट रोडवरील उड्डणपुलाची एक मार्गिका जबरदस्तीने खुली करण्याचा प्रयत्न माजी मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी केल्याने हा प्रकार केवळ श्रेयवादातून झाल्याचे बोलले जात आहे.

91
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आततायीपणा
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आततायीपणा

लोअर परळ डिलाईट रोडवरील उड्डणपुलाची एक मार्गिका जबरदस्तीने खुली करण्याचा प्रयत्न माजी मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी केल्याने हा प्रकार केवळ श्रेयवादातून झाल्याचे बोलले जात आहे. या पुलाचे श्रेय सरकारला जावून नये म्हणून आदित्य ठाकरेंनी जबरदस्तीने हा याची एक मार्गिक खुली केली. मात्र अशाचप्रकारे सत्ता असताना घाईघाईत ठाकरेंनी घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल आणि बोरीवली उड्डाणपुलाचा मार्ग खुला केला होता आणि उद्घटनाच्या दोन चार दिवसांतच त्याठिकाणी दुर्घटना घडल्याने महापालिकेला ही पुल बंद ठेवून त्याची कामे पुन्हा करावी लागली होती. त्यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता आदित्य ठाकरेंचा हा आततायीपणा असल्याचे स्पष्ट होत आहे. (Aditya Thackeray)

राज्यात ठाकरे सरकार असताना घाटकोपर मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डणपुलाचे लोकार्पण तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते जुलै २०२१मध्ये झाले. परंतु जेव्हा या पुलाचे लोकार्पण झाले होते, तेव्हा या पुलाच्या पृष्ठभागाचे काम चांगल्या प्रकारे झाले नव्हते. परंतु या पुलाच्या नामकरणाचा वाद पेटल्याने मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला निर्देश देत घाईघाईत हा पूल खुला करून दिला. परंतु हा पूल खुला केल्यानंतर यावरील पृष्ठभागाचे काम चांगल्या प्रकारे झाले नव्हते, अनेक भाग खडबडीत झाला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तेव्हा याचे सरफेसिंग पुन्हा करावे असे निर्देश प्रशासनाला दिले होते. तसेच बोरीवली पूर्व पश्चिम जोडणारा आर एम भट्टड मार्गावरील कोरा केंद्र येथील येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर जून २०२२मध्ये उपनगराचे तत्कालिन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्यांचे खांब निखळून पडले आणि त्याच्या पृष्ठभाग खराब झाला होता. त्यामुळे या भागाची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा हे पूल बंद करण्यात आले होते. (Aditya Thackeray)

त्यामुळे आजवर आपल्यालाच याचे श्रेय मिळावे म्हणून घाईघाईत लोकार्पण करत उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतला होता. घाटकोपर मानखुर्द पुलाचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून घाईघाईत प्रशासनाला हाताशी धरून याचे लोकार्पण करण्यात आले होते. तर उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने याचे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून तत्कालिन सरकारमधील मंत्र्यांनी याचे घाईघाईत उद्घाटन केल्याने पुढे त्यांचे परिणाम दिसून आले होते. त्यामुळे यासर्व घटनांमधून आता महापालिका प्रशासनातील अधिकारी शहाणे झाले असून त्यांनी सर्व प्रकारची तपासणी व शाहनिशा करूनच डिलाईट रोड पूलाचे काम पूर्ण झाल्याची खातरजमा झाल्याशिवाय याची मार्गिका खुली करता येत नसल्याने प्रशासनाने काही दिवसांचा अवधी घेतला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या आधीच्या दोन प्रकारांचा अनुभव लक्षात घेता डिलाईट रोड पुलाची मार्गिका खुली करण्याचा केवळ श्रेयाच्या लढाईत केलेला आततायीपणा असल्याचे बोलले जात आहे. (Aditya Thackeray)

(हेही वाचा – Aaditya Thackeray : महापालिकेने एफआयआर दाखल का केला?)

मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे मी आवाज उठवल्यानंतर सरकार निर्णय घेते, अशाप्रकारचा समज पसरवत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय घेतला जाणार होता त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी याबाबतचे ट्विट करत प्रशासनावर टिका केली होती. पण त्याच दिवशी निर्णय घेण्यात आल्यानंतर आपल्या ट्विटनंतर हा निर्णय घेण्यता आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंत नवी मुंबई मेट्रोबाबतही ट्विटनंतर उद्घाटनाशिवाय मेट्रो सुरु झाल्याने आपल्याला घाबरुन सरकार निर्णय घेत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यातून डिलाईट रोड पुलाची एक मार्गिका खुली करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी करून आपल्यामुळेच ही मार्गिका सर्वांसाठी खुली होऊ शकली असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बोलले जात आहे. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.