Anjali Damania : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

89
जालन्याच्या अंबड येथील एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी प्रेक्षाभक भाषण केल्याचा आरोप केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया (Anjali Damania) ह्या छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. मात्र कारने छगन भुजबळांच्या घराच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले.

फर्नांडिस कुटुंबीयांची जागा हडपली

मंत्री छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील खाजगी बंगला हा फर्नांडिस कुटुंबीयांची जागा हडपून बांधण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. या वेळी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत फर्नांडिस कुटुंबीयांना समोर आणले आणि त्यांची कशी फसवणूक केली याची माहिती दिली. फर्नांडिस कुटुंबीयांपैकी डॉरीन फर्नांडिस यांची तीनही मुले म्हणजे फ्रान्स, सेव्हिओ आणि नोबेल ही गतिमंद आहेत. सध्या ती बांद्रा येथे राहण्यास आहेत. साडेआठ कोटी रुपये हे समीर भुजबळ या कुटुंबीयांना या जागेच्या बदल्यात देणार होते. मात्र अद्यापही भुजबळांनी त्यांना पैसे दिलेले नाहीत, असा आरोप अंजली दमानिया यांचा आहे.

सोमवारपासून भुजबळांच्या विरोधात आंदोलन 

अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी यासंदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशी देखील मधल्या काळात चर्चा केल्याचा सांगितले. ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप ग्रुप बनवून समीर भुजबळ आणि फर्नांडिस कुटुंबीयांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असे अंजली दमानिया यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील या संदर्भात पाठपुरावा केला परंतु अजूनही मुलांना त्यांच्या हक्काच्या जागेसाठी हेलपाटे घालावे लागत असल्यामुळे त्यांची झालेली परिस्थिती सांगताना अंजली दमानिया भाऊक झाल्या. जालन्याच्या सभेत जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी स्वतः काय केलं असा सवाल करत 48 तासात फर्नांडिस कुटुंबीयांना त्यांचे पैसे द्या नाहीतर सोमवारपासून छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील खाजगी घरासमोर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी उभी राहणार असल्याचा इशाराच अंजली दमानिया यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.