Murder : प्रियकराकडून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या; सांकेतिक शब्दावरुन बेपत्ता तरुणीच्या मृतदेहाचा शोध

276
Malabar Hill Murder Case : मलबार हिल येथील महिलेच्या हत्येप्रकरणी नोकराला अटक

प्रियकराने आत्महत्येपूर्वी (Murder) लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये टाकलेल्या सांकेतिक शब्दामुळे महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह लोणावळ्याच्या जंगलातून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या तरुणीचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आणि जंगली श्वापदांनी खाल्यामुळे अर्धवट अवस्थेत मिळून आला आहे. १२ डिसेंबर रोजी जुईनगर येथे ट्रेनखाली आत्महत्या केलेल्या तरुणाने आत्महत्येपूर्व प्रेमप्रकरणातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह लोणावळा येथील जंगलात टाकून स्वतः नंतर ट्रेनखाली आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

वैष्णवी मनोहर बाबर (१९) असे या दुर्देवी तरुणीचे नाव असून वैभव बुरुंगले (२४) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. वैष्णवी हि कळंबोली सेक्टर १ येथे कुटुंबियांसोबत राहण्यास होती. मुंबईतील सायन येथील ‘एसआयएस’ कॉलेजात शेवटच्या वर्षात शिकत होती, वैष्णवी हि १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती, त्यानंतर रात्री उशीर होऊन देखील ती घरी परतली नसल्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात वैष्णवीची हरविल्याची तक्रार दाखल केली होती. वैष्णवीचा शोध सुरु असताना त्याच दिवशी तिचा प्रियकर देखील वैभव हा देखील बेपत्ता झाला होता. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी वाशी रेल्वे पोलिसांना वैभव याचा मृतदेह जुईनगर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळावर मिळून आला होता, वैभव याने रेल्वेखाली आत्महत्या (Murder) केल्याचे समोर आले, पोलिसांना वैभव याच्या मृतदेह जवळ मिळून आलेला मोबाईल फोन फुटल्यामुळे मोबाईलमधील माहिती काढण्यासाठी मोबाईल फोन तज्ज्ञाकडे देण्यात आला होता.

(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)

प्रकरण गंभीर असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी विषेश तपास पथक तयार करून हे प्रकरण विशेष पथकाकडे सोपविण्यात आलॆ. वैभव याने आत्महत्या केल्यामुळे वैष्णवी कुठे आहे, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. वैष्णवीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने वैभवचा मोबाईलची माहिती तज्ञाकडून मिळवली असता पोलिसांना त्यात वैभव याने मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाईड नोट मिळून आली, तसेच या दोघांचे शेवटचे लोकेशन खारघर हिल्स परिसरात असल्याचे व त्याच दिवशी वैष्णवीची वैभवने हत्या करून स्वतः आत्महत्या (Murder) केल्याचे सुसाईड नोटवरून समोर आले. तसेच सुसाईड नोटमध्ये सांकेतिक शब्दात ‘LO1-501’ असे लिहण्यात आले होते. विशेष तपास पथकाने या सांकेतिक शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञाची मदत घेतली तसेच खारघर हिल्स येथील जंगलात वैष्णवीचा मृतदेहाचा शोध सुरु होता. दरम्यान या सांकेतिक शब्दाचा अर्थ वन विभागा कडून शोधण्यात आला. लोणावळा येथील जंगलातील झाडांना वनविभागाकडून क्रमांक देण्यात आलेला आहे, हे क्रमांक ‘LO1-501’ असे देण्यात आले आहे.

पोलिसांकडून वेळ न दडवता वन विभाग, शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा, सिडको आणि अग्निशमन दलाच्या मदतीने लोणावळा जंगलात वैष्णवीच्या मृतदेहाचा शोध सुरु केला असता पोलिसांना लोणावळा जंगलातील ‘LO1-501’ या क्रंमाकाच्या झाडाजवळ एक कुजलेला आणि अर्धवट मृतदेह आढळून आला, जंगली श्वापदांनी मृतदेहाचा काहि भाग खाल्ल्यामुळे मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांना मिळून आले नाही. दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ कॉलेजचे ओळखपत्रे तसे कपडे मिळून आल्यामुळे हा मृतदेह वैष्णवीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी फॉरेंसिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.