Mumbai Crime : डास पडलेली पुरी-भाजी न खाल्ल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

कुर्ला टर्मिनस परिसरातील घटना

134
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

‘डास’ पडलेली पुरीभाजी बदलून मागितली म्हणून बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करून लूटमार केल्याची घटना लोकमान्य टिळक टर्मिनस (Kurla Terminus) वर घडली. या हल्ल्यात २२ वर्षीय तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी जबरी चोरी, मारहाण करणे धमकी दिल्या प्रकरणी खाद्यपदार्थ विक्रेत्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला खाद्य पदार्थ विक्रेता हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Mumbai Crime)

शहाबुद्दीन इजाजुद्दीन खान (२५) असे अटक करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्याचे नाव आहे. शहाबुद्दीन हा गोवंडी बैगणवाडी येथे राहणारा आहे. शहाबुद्दीन हा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बेकायदेशीर खाद्यपदार्थचा गाडी लावतो, त्या ठिकाणी तो पुरीभाजीची विक्री करतो. कांदिवली चारकोप येथे राहणारा उमंग दिनेश सिंह (२२) हा बुधवारी सकाळी ११, वाजता एका नातलगाला ट्रेनमध्ये बसविण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आला होता, नातलगाला सोडवल्यानंतर तो जाण्यास निघाला असता त्याला भूक लागली म्हणून उमंग हा टर्मिनसच्या बाहेर असलेल्या शहाबुद्दीनच्या पुरीभाजीच्या गाडीवर पुरीभाजी खाण्यासाठी आला. त्याने पुरीभाजी मागवली असता, भाजीमध्ये मच्छर (डास) पडलेला बघून उमंगने भाजी दुसरी देण्याची विनंती शहाबुद्दीनला केली. (Mumbai Crime)

(हेही वाचा – IPL 2024 Hardik Pandya : मुंबईत हार्दिक जास्त ट्रोल होणार असं ‘या’ खेळाडूला का वाटतं?)

अशी घडली घटना 

शहाबुद्दीनने ‘खाना है खा नही तो पुरीभाजी का पैसा देके चलता बन’ दुसरी भाजी नही मिलेगी, अशी धमकी दिली.उमंगने पुरीभाजीची प्लेट तशीच ठेवून पैसे न देता निघाला असता शहाबुद्दीनने त्याला पकडून बळजबरीने त्याच्या खिशात हात घालून पैसे काढले, या वेळी झालेल्या भांडणात शहाबुद्दीनने उमंगला लाथाबूक्यांनी मारहाण करून गाडीवरील चाकूने उमंगवर वार करण्यास सुरुवात केली, उमंगच्या मदतीला काही प्रवासी धावून आले असता शहाबुद्दीन याने प्रवाशावर चाकू उगारून’ कोई बीच मे आया तो खतम कर दुगा’अशी धमकी देत प्रवाशांवर धावून गेला. (Mumbai Crime)

उमंगने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून टिळक नगर पोलीस ठाणे गाठले, पोलिसांनी प्रथम उमंगवर राजावाडी रुग्णालयात उपचार करून त्याची तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आणि शहाबुद्दीन इजाजुद्दीन खान याला अटक केली. कुर्ला टर्मिनस हे रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी खाद्यपदार्थांपासून सिगारेट-गुटखा खुलेआम विकला जातो. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून परराज्यातून किंवा मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची लूट करीत असतात, त्यांना जाब विचारणाऱ्यांना हे बेकायदेशीर धंदेवाले मारहाण करतात. कुर्ला टर्मिनस (Kurla Terminus) येथे प्रवाशांची सर्रासपणे लूट सुरू असते, रिक्षा टॅक्सी चालकापासून बेकायदेशीर धंदेवाल्यांकडून ही लूट सुरू असते, रेल्वे पोलीस, आरपीएफ पासून तसेच टिळक नगर पोलीस ठाण्याकडून या बेकायदेशीर धंदेवाल्याना पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील प्रवाश्याकडून करण्यात येत आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.