IPL 2024 Hardik Pandya : मुंबईत हार्दिक जास्त ट्रोल होणार असं ‘या’ खेळाडूला का वाटतं?

IPL 2024 Hardik Pandya : सलग दोन पराभवांनंतर आता मुंबईचा संघ मुंबईत पहिला सामना खेळणार आहे. 

150
IPL 2024 Hardik Pandya : मुंबईत हार्दिक जास्त ट्रोल होणार असं 'या' खेळाडूला का वाटतं?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स एक एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यावेळी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो, भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने तसा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदाबादपेक्षा जास्त मुंबईमध्ये हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. पण हार्दिक पांड्याकडे आशा परिस्थितीचा सामना करण्याचा धैर्य आहे, असेही तिवारी म्हणाला आहे. तो पीटीआयशी बोलत होता. (IPL 2024 Hardik Pandya)

आयपीएल १७ व्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतले. मुंबईने हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्वाची धुरा सोपवली. रविवारी गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आमनासामना झाला. या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या चाहत्यांनी ट्रोल केले आहे. अहमदाबादमध्ये त्याला हूटिंग करण्यात आले. आता वानखेडे मैदानात होणाऱ्या मुंबईच्या सामन्यावेळी हार्दिक पांड्याला आणखी ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. (IPL 2024 Hardik Pandya)

मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातने मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. मुंबईचा दुसरा सामना आज हैदराबादविरोधात हैदराबादमध्ये होणार आहे. मुंबईचा संघ यंदाच्या हंगामातील तिसरा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान विरोधात होणार आहे. याबाबत मनोज तिवारी याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) कौतुक तर केलेच, त्याशिवाय हार्दिक पांड्याला मुंबईमध्ये हूटिंगचा सामना करावा लागेल, असेही सांगितलं. (IPL 2024 Hardik Pandya)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : मराठी भाषेतील स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट आजपासून चित्रपटगृहांत; सुबोध भावेची पोस्ट चर्चेत)

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चषक दिला जिंकून

मनोज तिवारी म्हणाला की, मुंबईमध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) स्वागत कसं केले जातेय, हे पाहावं लागेल. मुंबईतील वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल करण्यात येईल, असे मला वाटतेय.कारण एक चाहता म्हणून रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवलं जाईल, असे कुणालाही वाटलं नव्हते. पण रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्यात आले, हे चाहत्यांना पटलं नाही. (IPL 2024 Hardik Pandya)

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा चषक जिंकून दिलाय. असे असतानाही रोहित शर्माला कर्णधारपद गमवावं लागले. रोहितला का काढलं, याबाबतचे कारण मला माहित नाही, पण चाहत्यांना ही गोष्ट रुचली नाही. आता वानखेडे स्टेडियमवर तर हार्दिक पांड्याला आणखी ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. पण हार्दिक पांड्या या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहे, असे मनोज तिवारी म्हणाला. (IPL 2024 Hardik Pandya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.