Drug Smuggling : डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक अटकेत

ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटशी संबंधित इतरांचाही शोध घेतला जात आहे. एनसीबी अनेक दिवसांपासून सादिकचा शोध घेत होती. सादिकच्या चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने म्हंटले आहे.

113
Drug Smuggling : डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक अटकेत

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात (Drug Smuggling) एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने या प्रकरणी डीएमकेचे माजी नेते आणि चित्रपट निर्माता जाफर सादिक यांना अटक केली आहे. जफर सादिक हा भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पसरलेल्या अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे.

(हेही वाचा – Ramdas Athawale : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता दुप्पट वाढवून देणार – रामदास आठवले)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई :

तामिळनाडूमध्ये या प्रकरणात (Drug Smuggling) आणखी ४ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. या देशांनी भारताला अन्नपदार्थांसोबत अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे सांगितले होते. अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशाचा वापर चित्रपट बनवण्यासाठी झाला का.. ? याचाही तपास एनसीबी करत आहे.

(हेही वाचा – किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका)

कोण आहे जाफर सादिक ?

पूर्वी सादिक हा द्रमुकच्या एनआरआय विंग चेन्नईचा पश्चिम उपसंघटक होता. नुकतीच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले की, सादिक हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पसरलेल्या ड्रग्ज तस्करीच्या (Drug Smuggling) नेटवर्कचा मास्टरमाईंड आहे. अलीकडेच, दिल्लीतील एका गोदामात झडतीदरम्यान, ५० किलो ड्रग्ज बनवणारा पदार्थ स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आला.

(हेही वाचा – Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील ‘हे’ दोन पक्ष NDA सोबत; भाजपाची ताकद वाढली)

तस्करीच्या रॅकेटशी संबंधित इतरांचाही शोध सुरु :

हे नेटवर्क (Drug Smuggling) खूप मोठे असू शकते, असे एनसीबीचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटशी संबंधित इतरांचाही शोध घेतला जात आहे. एनसीबी अनेक दिवसांपासून सादिकचा शोध घेत होती. सादिकच्या चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने म्हंटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.