Ramdas Athawale : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता दुप्पट वाढवून देणार – रामदास आठवले

चेंबूर मध्ये एक हजार विद्यार्थी क्षमतेचे एक नवीन वसतिगृह उभारण्यात येत आहे.

118
Ramdas Athawale : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता दुप्पट वाढवून देणार - रामदास आठवले
Ramdas Athawale : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता दुप्पट वाढवून देणार - रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चेंबूर मधील संत एकनाथ शासकीय वस तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेत विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता महागाई निर्देशांकानुसार दुप्पट वाढवून देण्यात येईल असे आश्वासन रामदास आठवले दिले.

वसतिगृहात वेळच्या वेळी स्वच्छता झाली करावी , वेळोवेळी आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांद्वारे विद्यार्थी विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्यांना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. सुरक्षा रक्षक वसतीगृहात असावेत. भोजन सुविधा आरोग्यदायी व नियमित दिली पाहिजे. यासह विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी तातडीने सोडविण्याचे निर्देश रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी दिले.

यावेळी समाज कल्याण उपायुक्त प्रसाद खैरनार ,आंबेडकर स्टुडंट असोसिएशन चे अनेक विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे ;तालुका अध्यक्ष रवी गायकवाड; महादेव साळवे रिपाइं चे युवक आघाडी मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेअध्यक्ष चंद्रशेखर कांबळे; सचिन बनसोडे असे अनेक रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Indian Music Therapy : परिपूर्ण उपचारासाठी भारतीय संगीत सर्वोत्कृष्ट; महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा बँकॉक येथे दावा)

राज्यभरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. मागील आठवड्यात आपण सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यभरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाज कल्याण विभागाची संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्यात अनेक प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत असे आठवले यांनी स्पष्ट केले.

मी वसतीगृहातूनच पुढे आलो आहे. वसतीगृहातला विद्यार्थी असतानाच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झालो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व प्रश्न निकाली काढतो असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.

चेंबूर मध्ये एक हजार विद्यार्थी क्षमतेचे एक नवीन वसतिगृह उभारण्यात येत आहे. त्या वस्तीगृहात सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे मैदानही उपलब्ध करून देण्याची सूचना आठवले यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.