Indian Music Therapy : परिपूर्ण उपचारासाठी भारतीय संगीत सर्वोत्कृष्ट; महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा बँकॉक येथे दावा

प्रथम चाचणीत ५ व्यक्तींना भारतीय संगितातील ‘राग गोरखकल्याण’ ऐकवण्यात आला. त्यानंतर सर्व व्यक्तींच्या नाडीचे ठोके सरासरी १५ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

107
Indian Music Therapy : परिपूर्ण उपचारासाठी भारतीय संगीत सर्वोत्कृष्ट; महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा बँकॉक येथे दावा

‘मंत्र, नामजप आणि भारतीय शास्त्रीय संगितातील राग (Indian Music Therapy) यांमुळे परिपूर्ण उपचार होतात. या प्राचीन, कोणत्याही प्रकारे हानी न करणाऱ्या उपचार पद्धतींचा वैद्यकीय चिकित्सेत उपयोग करण्यासंदर्भात संशोधन करण्याचे आवाहन वैद्यकीय समुहाला करतो’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे शॉन क्लार्क यांनी केले. नुकतेच बँकॉक, थायलँड येथे झालेल्या ‘सेवन्थ ग्लोबल पब्लिक हेल्थ कॉन्फरन्स’ या परिषदेत शॉन क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘निरामय आरोग्यासाठी, विशेषत: रक्तदाबावर केंद्रीत संगिताचे उपाय’ हा शोधनिबंध सादर केला.

(हेही वाचा – Urmila Matondkar : उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला; उर्मिला मातोंडकर यांचे काय होणार?)

११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर :

या शोधप्रबंधाचे लेखक ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक गुरु डॉ. जयंत आठवले असून शॉन क्लार्क सहलेखक आहेत. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरणा’चे पुरस्कार मिळाले आहेत. (Indian Music Therapy)

म्युझिक थेरेपी :

उच्च रक्तदाब असलेल्यांवर विविध ध्वनींच्या होणाऱ्या परिणामाचा (Indian Music Therapy) अभ्यास करणाऱ्या ४ चाचण्या सादर केल्या. चाचणी पूर्वी आणि चाचणीनंतर यात सहभागी व्यक्तींचा रक्तदाब ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या यंत्राद्वारे मोजण्यात आला. या चाचण्यांत सहभागी व्यक्तींना चाचणीच्या पूर्व २ दिवस, तसेच चाचणीच्या रात्री त्यांचे रक्तदाबावरील औषध न घेण्याचे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठरवण्यात आले होते. चाचणीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सर्व चाचण्या करण्यात आल्या. (Indian Music Therapy)

(हेही वाचा – Dargah : पुण्यातील ‘त्या’ दर्ग्याचे बांधकाम अनधिकृतच; दर्ग्याच्या ट्रस्टींची कबुली; स्वतः बांधकाम तोडणार)

संगीत उपचाराचे सकारात्मक परिणाम :

प्रथम चाचणीत ५ व्यक्तींना भारतीय संगितातील (Indian Music Therapy) ‘राग गोरखकल्याण’ ऐकवण्यात आला. त्यानंतर सर्व व्यक्तींच्या नाडीचे ठोके सरासरी १५ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी सकाळी (७२ घंटे रक्तदाब नियंत्रक औषध घेतले नसतांनाही) ५ पैकी ४ व्यक्तींचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. सर्व व्यक्तींच्या प्रभावळीतील नकारात्मकता सरासरी ६० टक्क्यांनी घटल्याचे, तर सकारात्मकता १५५ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. दुसऱ्या चाचणीत २ व्यक्तींना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप ऐकवण्यात आला. तिसऱ्या चाचणीत ३ व्यक्तींना ‘ॐ’ या बीज मंत्राचा ध्वनी ऐकवण्यात आला. या दोन्ही चाचण्यांचे परिणाम पहिल्या चाचणीप्रमाणेच होते.

(हेही वाचा – Mumbai BJP : मुंबई भाजपाकडून सहा डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन)

इलेक्ट्रॉनिक वाद्ये, तसेच या रचनेतील असम्यक स्वर आणि ध्वनी यांतून नकारात्मक स्पंदनांची निर्मिती होऊ शकते :

चौथ्या चाचणीत २ व्यक्तींना ‘मारकोनी’ या वाद्यवृंद समुहकृत ‘वेटलेस’ (Weightless) ही जगातील प्रसिद्ध ‘तणावमुक्ती देणारी’ म्हणून नावाजलेली संगीत रचना ऐकवण्यात आली. त्यानंतर सर्व व्यक्तींचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले; परंतु नाडीचे ठोके वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचाही रक्तदाब आणखी कमी झाल्याचे आढळले. आधीच्या ३ चाचण्यांच्या तुलनेत या चाचणीत सहभागी व्यक्तींच्या प्रभावळीतील नकारात्मकता मात्र वाढल्याचे आणि सकारात्मकता घटल्याचे आढळले; कारण ‘वेटलेस’ या संगिताची रचना करण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रॉनिक वाद्ये, तसेच या रचनेतील असम्यक स्वर आणि ध्वनी यांतून नकारात्मक स्पंदनांची निर्मिती होऊ शकते, असे क्लार्क यांनी सांगितले. (Indian Music Therapy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.