Telangana : काँग्रेस शासित तेलंगणात पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर पोलिसांचा लाठीचार्ज

ही घटना शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी घडली, जेव्हा तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यातील प्रतिष्ठित कोमुरावेल्ली मंदिरात भक्तांवर लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली.

175

तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यात पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केला. हे भाविक महाशिवरात्रीनिमित्त जल अर्पण करण्यासाठी आले होते. हे प्रकरण सिद्धीपेट जिल्ह्यातील आहे, जेथे महाशिवरात्रीनिमित्त कोमुरावेल्ली मंदिरात भाविक जलाभिषेकासाठी पोहोचले होते. कोमुरावल्ली मंदिरात भाविकांवर लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे वातावरण तणाव 

ही घटना शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी घडली, जेव्हा तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यातील प्रतिष्ठित कोमुरावेल्ली मंदिरात भक्तांवर लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली. या घटनेत महाशिवरात्री साजरी करण्यासाठी जमलेल्या भाविकांची गर्दी होताच पोलिस अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे वातावरण तंग झाले. पुजाऱ्यांनी पारंपरिक पूजा केल्यानंतर भाविकांची गर्दी वाढली. खरं तर, कोमुरावेलीच्या मंदिरात पिली बंदरीचा विधी पारंपरिकपणे केला जातो. यावेळी भाविकांनी मंदिराभोवती लावलेले बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी थेट लाठीचार्ज केला.

(हेही वाचा Dargah : पुण्यातील ‘त्या’ दर्ग्याचे बांधकाम अनधिकृतच; दर्ग्याच्या ट्रस्टींची कबुली; स्वतः बांधकाम तोडणार)

भाजपाकडून टीका 

या लाठीचार्जदरम्यान पोलिसांनी आक्रमक रणनिती अवलंबली आणि महिलांनाही लक्ष्य केले. याठिकाणी मंदिरात मोठा जमाव जमणार असल्याची आगाऊ माहिती पोलिसांना होती, मात्र प्रशासनाने बंदोबस्त करण्याऐवजी लाठ्या-काठ्या घेऊन भाविकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. या लाठीचार्जमध्ये मोठ्या संख्येने भाविक जखमी झाले.

तेलंगणा (Telangana) भाजपचे कोषाध्यक्ष शांतीकुमार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या X हँडलवर पोस्ट केले, “रेवंत रेड्डी सरकारचे हिंदूंवर अत्याचार! तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील कोमुरावेली मंदिरात पोलिसांनी निष्पाप भाविकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी महिला भाविकांनाही सोडले नाही. हा हिंदूंच्या मुलभूत हक्कांवरचा हल्ला आहे. रेवंत रेड्डी, राज्यातील हिंदूंशी अशी अमानवी वागणूक का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.