Urmila Matondkar : उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला; उर्मिला मातोंडकर यांचे काय होणार?

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या.

320
Urmila Matondkar उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला; उर्मिला मातोंडकर यांचे काय होणार?

सिनेसृष्टीतून राजकारणात प्रवेश करत दुसरी राजकीय इनिंग खेळण्यासाठी चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु आता याच शिवसेनेची दोन शकले पडली असून मातोंडकर या अजूनही उबाठा शिवसेनेसोबतच आहेत. मात्र या उबाठा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशी आघाडी केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सोडला जाणार आहे. त्यामुळे दुसरी राजकीय इनिंग खेळण्यासाठी सेनेत प्रवेश करणाऱ्या मातोंडकर यांचा उत्तर मुंबईतून उभे राहण्याचा स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे आता मातोंडकर यांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. (Urmila Matondkar)

गोपाळ शेट्टी यांना दिली चांगलीच टक्कर

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या. या निवडणुकीत मातोंडकर यांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना चांगलीच टक्कर दिली होती. या निवडणुकीत तब्बल २ लाख ४१ हजार मतांचे दान मातोंडकर यांच्या ओटीत पडले होते. गोपाळ शेट्टी यांनी ६ लाख ६४ हजार मते मिळवत मोठा विजय मिळवला होता. मात्र, नवीन चेहरा असूनही मातोंडकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या तुलनेत २५ हजार मते अधिक मिळवली होती. (Urmila Matondkar)

यासाठी मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

परंतु या निवडणुकीतील पराभवानंतर मातोंडकर यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राज्यात ठाकरे सरकार विराजमान झाल्यावर १ डिसेंबर २०२० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. कंगना राणावत यांच्याकडून सेनेवर वारंवार टीका होत असल्याने तिला टक्कर देण्यासाठी मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. पण ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार, खासदार, माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी बाजूला होत शिवसेनेवर दावा केला. (Urmila Matondkar)

(हेही वाचा – Prakash Ambedkar : काँग्रेसमध्ये सुपारी बाज,काँग्रेसवाले भुरटे चोर – प्रकाश आंबेडकर)

काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई

मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या पक्षाची असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उबाठा शिवसेना असे नाव झाले आहे. पण या उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची महविकास आघाडी झाली आहे. राज्यात इंडी आघाडीच्या वतीने तिन्ही पक्ष आगामी निवडणूक लढवत असून मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघ पैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबई या चार मतदार संघात उबाठा शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ येत आहे. (Urmila Matondkar)

काँग्रेस पक्षात राहिल्या असत्या तर त्या दावेदार ठरल्या असत्या..

परंतु ज्या हेतूसाठी शिवसेनेने भाजपला टक्कर देण्यासाठी उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना आपल्या पक्षात घेतले त्यांना ना विधान परिषदेवर पाठवले ना राज्य सभेवर पाठवले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून मातोंडकर या उबाठा शिवसेनेत राहिल्या. पण हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्याच्या निर्धार उबाठा शिवसेनेनं पक्का केल्याने मातोंडकर यांचा स्वप्न भंग झाला आहे. ज्या काँग्रेसला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्याच काँग्रेसला हा मतदारसंघ सोडल्याने या त्यांच्या सर्वच आशा धूसर झाल्या आहेत. काँग्रेस पक्षात राहिल्या असत्या तर त्या दावेदार ठरल्या असत्या, पण काँग्रेस मध्ये जण्याचेही दरवाजे बंद असल्याने मातोंडकर यांचे काय होणार असा सवाल केला जात आहे. (Urmila Matondkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.