Dombivli Crime : डोंबिवलीत तडीपार गुंड ‘शेंबड्या’ला कोयत्यासह अटक, पोलिसांची मध्यरात्री थरारक कारवाई!

75
Video Call वर खासगी संवाद साधणे पडले महागात; इन्फ्लुएन्सरकडे मागितली १५ लाखांची खंडणी
Video Call वर खासगी संवाद साधणे पडले महागात; इन्फ्लुएन्सरकडे मागितली १५ लाखांची खंडणी
  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli Crime : डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोडला असलेल्या डाॅ. आंबेडकर आंबेडकर नगर झोपडपट्टीत राहणारा संजय उर्फ शेंबड्या मधुकर साळवे (५४) हा सराईत गुन्हेगार आहे. विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे गेल्या २० दिवसापूर्वी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांच्या आदेशावरून त्याला १८ महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपारीच्या आदेशांचा भंग करून शेंबड्या गुंड डोंबिवलीत सावरकर रोडवर येऊन हातात कोयता घेऊन दहशत माजवत होता. पोलिसांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या कौशल्याने या गुंडाला जेरबंद केले. (Dombivli Crime)

रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या निर्देशांनुसार गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक अच्युत मुपडे, सहाय्यक उपनिरीक्षक नागपुरे, हवालदार दीपक वानखेडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ सेवन, शस्त्र हातात घेऊन दहशत पसरविणे, अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. (Dombivli Crime)

(हेही वाचा – Pune Crime : एकाच तरुणीवर जडले चौघांचे प्रेम; ‘कॉमन गर्लफ्रेंड’मुळे जीवलग मैत्रीचा रक्तरंजित शेवट)

डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड भागात पोलिसांचे गस्ती जात असताना एका इसमाने पोलिसांना माहिती दिली. सावरकर रोड परिसरात एक इसम हातात कोयता घेऊन उभा असून त्याच्या हातातील कोयता पाहून पादचारी, वाहन चालक, दुकानदार भयभीत झाले आहेत. ही खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच तो इसम पळू लागला. पोलिसांनी विलंब न लावता त्या गुंडाचा पाठलाग सुरू केला. फर्लांगभर अंतरावर पोलिसांनी त्याची जागीच गाठडी वळली. संजय साळवे (Sanjay Salve) उर्फ शेंबड्या असे नाव सांगणाऱ्या या गुंडाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता आढळून आला. या कोयत्याद्वारे शेंबड्या सावरकर रोडला दहशत पसरवित होता. (Dombivli Crime)

रिक्षा व्यवसायाकडून गुन्हेगारीकडे वाटचाल

हद्दपार केले असतानाही शेंबड्या डोंबिवलीत कसा आला ? याचे तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे हद्दपारीच्या आदेशांचा भंग आणि शस्त्र प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली शेंबड्याच्या विरोधात त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून रिक्षावाला शेंबड्या गुंडाची सावरकर रोडवरील डाॅ. आंबेडकर झोपडपट्टी भागात दहशत आहे. तो यापूर्वी रिक्षा व्यवसाय करत होता. नंतर तो गुन्हेगारीकडे वळला. हद्दपार केलेला शेंबड्या पुन्हा डोंबिवलीत आल्याने सावरकर रोड परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या गुंडाला अटक केल्याच्या वृत्ताने भयभीत रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडून पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (Dombivli Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.