Pune Crime : एकाच तरुणीवर जडले चौघांचे प्रेम; ‘कॉमन गर्लफ्रेंड’मुळे जीवलग मैत्रीचा रक्तरंजित शेवट

102
चार तरुणांमध्ये झालेला वाद आणि हिंसा
पुण्यातील प्रेमसंबंधांमुळे झालेल्या हिंसाचाराचे दृश्य.

Pune Crime : पुण्यातील गोखलेनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांच्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाची हत्या झाली असून, आरोपी हे मृत तरुणाचे जवळचे मित्र असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चारही तरुणांचे एकाच मुलीवर प्रेम जडले होते आणि त्यातून निर्माण झालेल्या वादात एका मित्राचा जीव गेला.

उपलब्ध माहितीनुसार, हर्ष मच्छिंद्र जाधव (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. हर्ष, अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे तसेच माऊली देवकर हे चौघेही एकमेकांचे निकटचे मित्र होते. मात्र, एकाच तरुणीसोबत चौघांचेही प्रेमसंबंध असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनत त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हर्षने मद्यधुंद अवस्थेत एका मित्राच्या घरी जाऊन गोंधळही घातला होता. यावेळी संबंधित तरुणीच्या कारणावरून वाद झाला आणि शिवीगाळही करण्यात आली. त्याचाच राग मनात ठेवून ही हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा: Yoga Sangam 2026 : आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी देश सज्ज; जाणून घ्या काय आहे यंदाची खास संकल्पना  

वादावादीच्या प्रकरणानंतर तिनही आरोपी मित्रांनी, हर्षला गाठून त्याच्यावर बेसबॉल स्टिकने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे हर्ष गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेनंतर तिनही आरोपींनी पुण्यातून पलायन केले होते. मात्र, चतुःशृंगी पोलिसांनी त्यांची मोबाईल लोकेशन्स ट्रॅक करत आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली, आणि तिन्ही संशयितांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यात आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा तरुणांमधील प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद आणि त्यातून वाढणारी हिंसक प्रवृत्ती याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रेमाच्या किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर एका तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: BMC मध्ये ‘अर्बन टायगर’च्या मोठ्या बंडाची तयारी; शिंदे गटाचे मिशन ४५ यशस्वी होणार?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.