
Ram Mandir, Ayodhya: अयोध्या येथील राम मंदिराच्या एसआयटी तपासाला आता वेग आला आहे. तसेच देणगी घोटाळ्याशी संबंधित पुरावे असल्यास विशेष तपास पथकाकडे सादर करण्याचे आवाहनही या पथकाने केलेले असतानाच या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. एसआयटी ट्रस्टशी संबंधित व्यक्तिंची चौकशी करत आहे तसेच मंदिराच्या कामकाजात सहभागी असलेल्यांचीही चौकशी केली जात आहे.
विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरात जमा होणाऱ्या देणग्यांची, तसेच त्यांची मोजणी आणि बँकेत जमा करण्याच्या प्रक्रियेची चौकशी करत आहेत. तपास पथक दानपेट्यांमधून जमा होणाऱ्या रोख रकमेपासून ते सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांच्या मोजणी केंद्रांपर्यंतच्या प्रक्रियेची तपासणी करत आहे. आता रामललाचा रत्नजडीत हार आणि चरण पादुकाही गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या वस्तूंचीही चोरी झाल्याचा संशय आहे.
हेही वाचा – US Iran MoU: “इराण झुकला नाही, अमेरिका मजबूर झाली!”; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा दावा
एसआयटीने गुरुवारी या प्रकरणी गोपाल राव आणि टिन्नू यादव यांची पुन्हा चौकशी केली. हिऱ्यांनी जडवलेला हार आणि चरण पादुकांविषयी राम मंदिराच्या पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुजाऱ्यांनी सांगितले की, हार आणि चरण पादुका मूर्तीला अर्पण केल्यानंतर टिन्नू यादव यांना परत करण्यात आल्या. टिन्नू यांनी सांगितले की, या वस्तू वितळवून सोन्याच्या विटा बनवण्याचा हेतू होता. दरम्यान, दागिन्यांचे मालक कृष्ण देव तिवारी यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे सोन्याची वीट किंवा कोणतीही पावती सापडली नाही. सीसीटीव्ही फुटेज, बँकिंग रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि संबंधित कागदपत्रांचीही तपासणी केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
