Bank Fraud : जळगाव जनता बँकेत २६ लाखांचा अपहार

जिल्ह्यातील चाळीसगाव-जळगाव जनता सहकारी बँकेतील सहाय्यक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉ केले व बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला.

193
Bank Fraud : जळगाव जनता बँकेत २६ लाखांचा अपहार
Bank Fraud : जळगाव जनता बँकेत २६ लाखांचा अपहार

नामांकित असलेली जळगाव जनता सहकारी बँकेत (Jalgaon Janata Bank) मोठा अपहार झाल्याची धक्कादायक बातमी आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव-जळगाव जनता सहकारी बँकेतील (Jalgaon Janata Bank) सहाय्यक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉ केले व बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी बँक कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bank Fraud)

(हेही वाचा – Blockbuster Cinema : २०२३ साली एका दिवसात २८ लाख तिकिटांचा नवा विक्रम )

जळगाव जनता सहकारी बँकेच्या (Jalgaon Janata Bank) चाळीसगाव शाखेमध्ये २६ सप्टेंबर २०२० ते १२ मे २०२३ या कालावधीमध्ये बँकेतील सहाय्यक देविदास खंडू थोरात यांनी या काळात बँकेचे खातेदार सुमन भिकन कोतकर, उज्वला जयवंत कोतकर, जयवंत भिकन कोतकर यांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉ केले व तेथेच बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला. तसेच बँकेने ठेवलेल्या मौल्यवान व दस्तावेज मुदत ठेव पावतीची चोरी करून त्याचे बनावटीकरण करून खातेदारांची फसवणूक केली. या प्रकरणी भास्कर निंबाजी साळुंखे (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bank Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.