‘दारावरची टकटक सुरू झाली!’; यूपीआय शुल्कावरून Raj Thackeray यांचा थेट केंद्र सरकारवर कोणता मोठा निशाणा?

13
Raj Thackeray
Raj Thackeray
  • प्रतिनिधी

Raj Thackeray : देशभरात डिजिटल व्यवहारांचा वापर गतीने वाढल्यानंतर आता यूपीआय (UPI) व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या निर्णयावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) हा भार केवळ मर्चंट व्यवहारांवर लागू होईल आणि सर्वसामान्यांची लूट होणार नाही असा खुलासा केला असला, तरी या नियमाबाबत अद्याप स्पष्टतेचा अभाव दिसून येत आहे. याचा थेट परिणाम बाजारांवर होताना दिसत असून अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी थेट ‘नो क्यूआर’ (No QR) धोरण स्वीकारत डिजिटल पेमेंट बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, विरोधकांनीही या निर्णयामागे परदेशी कार्ड कंपन्यांचा दबाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंना थेट घरचाच सुरुंग? संजय राऊतांच्या भूमिकेवर BJP ने कोणते धक्कादायक प्रश्न केले उपस्थित? )

या व्यवहारांमध्ये २००० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या खरेदीवर ०.४ टक्के ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू केल्यास व्यापारी हा भार स्वतः सोसतील की तो ग्राहकांच्या माथी मारतील, यावर सरकारकडे कोणतीही ठोस नियंत्रण यंत्रणा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. आधी नोटाबंदी करून लोकांना डिजिटल व्यवहारांची सवय लावायची आणि नंतर अचानक अशा प्रकारे चार्जेस लावून तिजोरी भरायची, अशा धोरणामुळे व्यापारी आणि ग्राहक या दोघांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. ‘दारावरची टकटक!’ या शीर्षकाखाली सविस्तर पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी हा प्रकार म्हणजे नागरिकांना गुंगवून त्यांच्यावर टाकलेला ‘डिजिटल सापळा’ असल्याचे म्हटले आहे. डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी तरतूद का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच, “सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही, अन्यथा त्यावरही त्या १८% जीएसटी लावतील; पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन यूपीआयची जाहिरात करायचे, मग आता परत जाताना एमडीआर आणि जीएसटी कसा लावला हे हसून सांगणार का?” असा थेट व घणाघाती सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या हेतूवरच बोट ठेवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.