IPL 2027 : पुढील वर्षी आयपीएलचं २० वं पर्व; होणार मोठा सोहळा

IPL 2027 : धुमाल, मुझुमदार यांची कार्यकारिणीत फेरनिवड झाली आहे. 

16
IPL 2027 : पुढील वर्षी आयपीएलचं २० वं पर्व; होणार मोठा सोहळा
  • ऋजुता लुकतुके

IPL 2027              इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या २०व्या पर्वाच्या स्वागतासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या २०व्या पर्वाचा भव्य पद्धतीने सोहळा साजरा करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याच बैठकीत आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेवर अरुण सिंह धुमाल आणि एम. खैरुल जमाल मुजुमदार यांची पुन्हा निवड करण्यात आली. (IPL 2027)

१८ सप्टेंबर रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ही सभा झाली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, २०२७ मध्ये आयपीएलच्या दोन दशकांच्या प्रवासाचा विशेष उत्सव आयोजित केला जाणार आहे. मात्र या सोहळ्याचे स्वरूप आणि त्यासाठीचे विशेष कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. आयपीएलच्या कार्यकारिणीवर अरुण धुमाल आणि खैरुल जमाल मजुमदार यांची बिनविरोध निवड झाली. धुमाल हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी असून २०२२ पासून ते आयपीएलच्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. खैरुल जमाल मजुमदार हे मिझोराम क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून परिषदेवर कार्यरत आहेत. (IPL 2027)

(हेही वाचा – MSRTC : लालपरीच्या प्रवासात मोठा बदल; एसटीने अचानक नियम बदलल्याने प्रवाशांना फायदा होणार की तोटा?)

२००८ मध्ये आठ संघांसह सुरू झालेल्या आयपीएलने गेल्या १९ पर्वांत मोठा विस्तार केला. २०२२ पासून स्पर्धेत दहा संघ असून सध्या एका पर्वात ७४ सामने खेळवले जातात. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून ब्रेंडन मॅक्क्युलमने ७३ चेंडूंत नाबाद १५८ धावांची खेळी करत या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली होती. आयपीएलचा व्यावसायिक विस्तारही तितकाच मोठा आहे. २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी बीसीसीआयने माध्यम हक्क सुमारे ४८,३९० कोटी रुपयांना विकले होते. त्यामुळे आयपीएलचे जागतिक क्रीडा क्षेत्रातील आर्थिक महत्त्व आणखी वाढले आहे. (IPL 2027)

दरम्यान, २०२७ हे वर्ष बीसीसीआयसाठी आणखी एका कारणामुळे महत्त्वाचे ठरणार आहे. मंडळाने २०२८ मध्ये होणाऱ्या आपल्या शताब्दी सोहळ्याची प्रक्रियाही सुरू केली असून, डिसेंबर २०२७ पासून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आहे. त्यामुळे आयपीएलचे २०वे पर्व आणि बीसीसीआयची शताब्दी या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमध्ये विशेष उत्सवी वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (IPL 2027)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.