-
प्रतिनिधी
MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) सवलतींचा प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने डिजिटल प्रणालीवर भर दिला जात आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची (NCMC) नोंदणी व वितरण प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात वेगाने राबवली जात आहे. प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विविध शासकीय सवलतींचा लाभ भविष्यात डिजिटल माध्यमातूनच दिला जाणार असल्याने, सर्व पात्र सवलतधारकांनी आपली नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. (MSRTC)
(हेही वाचा – Weather Update : राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता)
कार्ड मिळण्याबाबत प्रवाशांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करताना महामंडळाने वितरण प्रक्रियेची तारीखही स्पष्ट केली आहे. ज्या प्रवाशांनी १९ सप्टेंबरपर्यंत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना २५ सप्टेंबरपासून अधिकृतपणे NCMC कार्डचे प्रत्यक्ष वाटप सुरू करण्यात येणार आहे. तसेच, १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना केंद्रावर एक विशेष ‘क्यूआर कोड’ (QR Code) असलेली पावती दिली जात आहे. प्रत्यक्ष प्लास्टिक कार्ड हातात येईपर्यंत, वाहकाकडील (कंडक्टर) ईटीआयएम (ETIM) मशीनवर ही पावती स्कॅन करून सवलतीचे तिकीट मिळवता येईल. या पावतीची वैधता ३० दिवसांची असून, या कालावधीत प्रवाशांनी आपले मूळ कार्ड ताब्यात घेऊन ते सक्रिय (Activate) करणे आणि त्यामध्ये आवश्यक रक्कम जमा (Top-up) करणे बंधनकारक राहणार आहे. (MSRTC)
(हेही वाचा – ‘हा’ देश आता अमेरिकेच्या ताब्यात? Donald Trump यांच्या घोषणेनं जगभरात खळबळ; नेमका काय आहे नवा करार?)
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नोंदणी आणि नियमावलीत अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. अनेक वृद्ध प्रवाशांचे वाढत्या वयामुळे बोटांचे ठसे (Biometric) मशीनवर न उमटल्याने नोंदणी रखडली होती; त्यावर उपाय म्हणून २१ सप्टेंबरपासून आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीद्वारे (OTP) नोंदणी करण्याची नवी सुविधा सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे ठशांअभावी कोणाचीही नोंदणी अडकणार नाही. याचबरोबर प्रवासादरम्यान कार्ड गहाळ अथवा चोरीला गेल्यास आर्थिक फटका बसू नये म्हणून २१ सप्टेंबरपासूनच जुने कार्ड तत्काळ ब्लॉक करून केवळ १९९ रुपये शुल्क भरून नवीन कार्ड मिळवण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. (MSRTC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

