iQOO 16 Launch : स्मार्टफोन मार्केटमध्ये iQOO 16 ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. iQOO कंपनीने अगदी कमी कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. कंपनीचा हा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन 29 सप्टेंबरला चीनमध्ये लॉन्च होणार आहे. मात्र, भारतीय ग्राहकांना iQOO 16 साठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. जाणून घेऊया, भारतातील या फोनच्या लॉचिंगासून ते फोनमधील सॉलिड फीचर्स आणि किंमतीविषयी A टू Z माहिती.
उपलब्ध माहितीनुसार, iQOO 16 मध्ये विशेषतः परफॉर्मन्स, गेमिंग, डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी या बाबींवर कंपनीचा भर असल्याचे समोर आले आहे. (iQOO 16 Launch)
165Hz डिस्प्लेची चर्चा
iQOO 16 मध्ये 2K रिझोल्यूशनचा Samsung AMOLED डिस्प्ले आणि 165Hz रिफ्रेश रेट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेमिंग आणि वेगवान स्क्रोलिंगसाठी हा डिस्प्ले महत्त्वाचा ठरू शकतो. या डिस्प्लेमध्ये Samsung च्या M16 OLED तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
कॅमेरामध्ये मोठा बदल
iQOO 16 च्या मागील बाजूस नव्या डिझाइनचा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. कंपनीने याचे डिझाइन अधिकृतपणे दाखवले असून, मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिसतो. कॅमेरा मॉड्यूलचा आकार आणि मांडणी मागील मॉडेलच्या तुलनेत वेगळी आहे. (iQOO 16 Launch)
काही अहवालांनुसार फोनमध्ये 50MP चे तीन रिअर कॅमेरे मिळू शकतात. यामध्ये मुख्य कॅमेऱ्यासोबत अल्ट्रावाइड आणि पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या तपशीलांपैकी सर्व माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.
हेही वाचा: Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये देहविक्रीचे रॅकेट उघड; पोलिसांनी सापळा रचत केला पर्दाफाश
गेमिंगसाठी परफॉर्मन्सवर भर
iQOO ची फ्लॅगशिप सीरिज प्रामुख्याने परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी ओळखली जाते. iQOO 16 मध्येही हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर आणि गेमिंग-केंद्रित फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतीय व्हेरिएंटसाठी प्रोसेसर, RAM, स्टोरेज आणि इतर हार्डवेअरची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. (iQOO 16 Launch)
भारतात लाँचिंग कधी?
सध्या iQOO युजर्ससाठी हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. iQOO 16 च्या भारतातील लॉन्चची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे चीनमधील लॉन्चनंतर भारतीय बाजारातील उपलब्धता आणि किंमत याबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय ग्राहकांसाठी फोनची अंतिम किंमत, कॅमेरा कॉन्फिगरेशन, प्रोसेसर, RAM-स्टोरेज पर्याय आणि लॉन्च टाइमलाइन याबाबत कंपनीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (iQOO 16 Launch)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

