Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी ७ ऑस्ट्रेलियन कर्णधार उतरले मैदानात; सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

Imran Khan Health : इम्रान खान सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत. 

11
Imran Khan Health : इम्रान खान यांच्यासाठी ७ ऑस्ट्रेलियन कर्णधार उतरले मैदानात; सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी
  • ऋजुता लुकतुके

Imran Khan Health               पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि १९९२ विश्वचषक विजेते इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीबाबत क्रिकेटविश्वातून चिंता व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सात माजी कर्णधारांनी आता आपल्या सरकारकडे इम्रान खान यांच्या स्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांच्या पुढाकाराने परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे. (Imran Khan Health)

या पत्रावर ग्रेग चॅपेल यांच्यासह अॅलन बॉर्डर, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, किम ह्यूजेस, मार्क टेलर आणि स्टीव्ह वॉ या सात माजी कर्णधारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. इम्रान खान यांच्याशी असलेल्या क्रिकेटविश्वातील जुन्या नात्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या तुरुंगातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Imran Khan Health)

(हेही वाचा – Maratha Reservation : अंतरवली सराटीच्या लाठीमारात नेमकं काय घडलं होतं? अखेर समोर आलं बंद पानांमागचं गूढ सत्य!)

इम्रान खान २०२३ पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील कायदेशीर प्रकरणे किंवा त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत कोणतीही बाजू घेण्याचा या माजी कर्णधारांचा उद्देश नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, तुरुंगात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला योग्य आणि मानवी वागणूक मिळणे हा मूलभूत मानवतावादी प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Imran Khan Health)

इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मुलांनी तुरुंगातील परिस्थिती, वैद्यकीय उपचार आणि कुटुंबीयांशी संपर्क यासंदर्भात आरोप केले आहेत. पाकिस्तानी सरकारने मात्र त्यांच्यावर योग्य उपचार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या दाव्यांवरून वाद कायम आहे. (Imran Khan Health)

(हेही वाचा – IPL Auction : आयपीएल लिलाव बंद करा, खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्यामुळे भुवनेश्वर कुमारची मागणी)

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारांच्या या पत्रामुळे इम्रान खान यांच्या तुरुंगवासाचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. यापूर्वीही २२ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी त्यांच्या मानवी हक्कांबाबत चिंता व्यक्त केली होती. आता ऑस्ट्रेलियातील क्रिकेटच्या दिग्गजांनी आपल्या सरकारकडे राजनैतिक पातळीवर हा विषय उपस्थित करण्याची मागणी केली आहे. (Imran Khan Health)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.