ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

7
ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

ST Bus Accident:सुपे (ता.बारामती) येथील घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी (ता.१६) सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटीचे वाहकही या अपघातात जखमी झाले असून ते उपचार घेत आहेत.

बारामती आगाराची बस पाटस (ता.दौंड) येथून विद्यार्थ्यांना घेऊन कुसेगाव, पडवी मार्गे सुपे घाटातून सुप्याकडे येत असताना घाटाच्या सुरूवातीच्या वळणावर उलटून अपघात झाला. या बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. काही जखमीं विद्यार्थ्यांना केडगाव-चौफुला येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. तर दोन जणांना पुण्याला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडियम स्कुलचे प्राचार्य डॉ.योगेश पाटील यांनी दिली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी पालकांसह मोठी गर्दी झाली होती.

अपघातस्थळाला विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींची विचारपूस करून पालकांना धीर दिला. दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी अपघात स्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.

हेही वाचा – Shivsena कोणाची? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी; शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाने प्रकरणात नवा ट्विस्ट

मला स्पोर्ट शूज घ्यायचे असल्याने वडिलांकडे मी हट्ट धरला. त्यामुळे बसमधून न येता दुचाकीवरून निघाल्याने अपघातातून वाचलो. अशी प्रतिक्रिया साईराज सुनिल चोरमले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.