Pune: पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण, पोलिसांकडून जप्तीची कारवाई

11
Pune: पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण, पोलिसांकडून जप्तीची कारवाई
Pune: पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण, पोलिसांकडून जप्तीची कारवाई

Pune: गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागांत गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही व्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि ड्रोन ऑपरेटरकडून ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेषतः मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी अनेक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा  – Helicopter Crash : धक्कादायक! बस अपघाताचं कव्हरेज करणाऱ्या मीडियाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

गणेशोत्सवातील गर्दीचे व्यवस्थापन, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा आणि ड्रोनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विनापरवाना ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पथक गर्दीच्या तसेच संवेदनशील ठिकाणी संशयास्पद ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार…
ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवानगी न घेता चित्रीकरण करणाऱ्या ऑपरेटरवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संबंधित ड्रोनही जप्त केला जाणार आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडिया रिल्स, यूट्यूब व्हिडिओ किंवा गणेशोत्सवाचे चित्रीकरण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्लॉगर्स आणि फोटोग्राफर्सना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नियमांचे पालन करणे आवश्यक…
गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडविल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच पोलिसांच्या बंदोबस्तात अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ड्रोन ऑपरेटर, व्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि इतर नागरिकांनी नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच ड्रोन उडवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.