-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan मुंबईसह ठाणे पोलिस ज्याला जंग जंग पछाडत होते तो सराईत गुन्हेगार कल्याणातील खडकपाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोठ्या महत्प्रयासाने या गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्बास शाहजोर सय्यद (२५) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून एकूण ६ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या ९ दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे कल्याण, ठाणे आणि मुरबाड येथील एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. (Kalyan)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड जवळील ९० फुटी वडवली रोडला असलेल्या गांधारी येथून अज्ञात चोरट्याने ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रेमानाथ ढोले, पोनि मारूती आंधळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे, आदींच्या पथकाने तपास चक्रांना वेग दिला. सदर गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि खासगी गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात अखेर या पथकाला यश आले. (Kalyan)
(हेही वाचा – Mumbai Local : धक्कादायक! पुरुष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण; व्हिडीओ तुफान व्हायरल)
२४ तासांत आवळल्या मुसक्या
खडकपाडा पोलिस ठाण्यात दुचाकीच्या मालकाने फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत या पथकाने ९० फुटी वडवली रोडला असलेल्या गांधारी परिसरात पेट्रोलिंग दरम्यान दुचाकीची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अब्बास सय्यद याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. अब्बास सय्यद हा कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या मलंगनगर या इराणी काबिल्यात राहणारा आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी ऑन द स्पॉट हस्तगत करण्यात आली. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan)
(हेही वाचा – American Citizenship Rules : जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांची पुन्हा कडक भूमिका, नवे कार्यकारी आदेश लागू)
८ गुन्ह्यांची उकल… ३ गुन्ह्यांत मोस्ट वॉन्टेड
तपासादरम्यान त्याच्याकडून विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधून चोरी केलेल्या एकूण ९ दुचाक्या असा एकूण ६ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खडकपाडा पोलिस ठाण्यासह कल्याण, ठाणे शहरातील तसेच मुरबाड येथील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय अब्बास सय्यद हा कापुरबावडी आणि बदलापूर पोलिस ठाण्यातील जबरी चोरीसारख्या मालमत्ते संबंधित एकूण ३ गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

