-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात आयोजित केलेल्या सभासद नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या या ४ दिवसांच्या अभियानात ऑफलाईन ६०० च्या वर व ऑनलाईन ४०० च्या वर साधारण हजारो विद्यार्थ्यांनी सभासदत्व स्वीकारले. (Kalyan)
(हेही वाचा – Kalyan च्या गांधारी परिसरातून विषारी कोब्रा जातीच्या नागाला जीवनदान)
३ ते ६ ऑगस्ट दरम्यान मॉडेल कॉलेज, तसेच ५ आणि ६ ऑगस्ट रोजी साकेत विद्यालयात ही विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनविसेच्या विचारांशी आणि कार्यपद्धतीशी जोडले जात संघटन बळकट करण्याचा संकल्प केला. या नोंदणी अभियानाला मनविसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कल्याण शहरात मनविसेला तरूणाईकडून मिळणारा हा वाढता पाठिंबा पाहता आगामी काळात संपूर्ण कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात आणखी व्यापक स्तरावर अभियान राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्याचा निर्धार नवनियुक्त शहरप्रमुख अंकुश राजपूत यांनी यावेळी व्यक्त केला. (Kalyan)
(हेही वाचा – Punjab Election २०२७ मध्ये भाजपची अकाली दलासोबत पुन्हा होणार युती? सुखबीर सिंग यांची पंतप्रधानांसोबत बैठक)
या अभियानात महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, जिल्हा उपाध्यक्षा रेणुका शिरोडकर, शहर संघटक वैशाली सोनटक्के, शहर सचिव सुनंदा शिंदे, उपशहराध्यक्षा मयुरी चासकर, प्रियांका खांडेकर, उपशहराध्यक्ष स्वप्निल पंडित, जिल्हा संघटक कल्पेश माने, विनीत भोई तसेच जिल्हा उपाध्यक्ष सतीश उगले, उमेश पावशे, रवी नरे, गणेश तिखंडे, महेंद्र कुंदे, हरीश शेलार, रोहित वाव्हळ, दिनेश सकटे, दिव्येश ठोंबरे, हर्षद इंदलकर, शुभम सांगळे, तुषार खणकर आणि सुधाकर जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

