-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : कल्याणच्या गांधारी परिसरात पुन्हा एकदा विषारी कोब्रा (Cobra) जातीचा नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाळ्यात या भागात वारंवार साप निघण्याच्या घटना घडत असून वाढते नागरीकरण आणि जंगलाच्या दिशेने वाढणारी मानवी वस्ती हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले)
गांधारी (Gandhari) परिसरातील रोडलगत उभारलेल्या आयुर्वेदिक औषध केंद्राच्या (Ayurvedic Medicine Center) तंबूमध्ये शुक्रवारी सकाळी विषारी कोब्रा जातीचा नाग आढळून आला. नाग दिसताच रहिवाशांनी तत्काळ सर्पमित्र संदीप पंडित (Sandeep Pandit) यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन अत्यंत सावधगिरीने नागाला पकडले आणि त्यानंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
घाबरू नका…सर्पमित्रांना कळवा
पावसाळ्यात सापांची बिळे पाण्याने भरल्याने, तसेच वाढत्या नागरीकरणामुळे जंगलालगतच्या भागातील सर्प मानवी वस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र संदीप पंडित यांनी केले आहे. विशेष म्हणजे गांधारी परिसरात यंदाच्या पावसाळ्यात नाग आढळण्याची ही दहावी घटना असून त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

