दिल्लीतल्या ‘त्या’ तासभराच्या भेटीत नेमकं काय घडलं? DCM Eknath Shinde यांनी उलगडले पडद्यामागचे तपशील

95
DCM Eknath Shinde and PM Narendra Modi during a meeting.
दिल्लीतल्या 'त्या' तासभराच्या भेटीत नेमकं काय घडलं? DCM Eknath Shinde यांनी उलगडले पडद्यामागचे तपशील
  • प्रतिनिधी

DCM Eknath Shinde          दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः अलीकडेच काही खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या या बैठकीकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले होते. (DCM Eknath Shinde)

संसद भवनात झालेल्या या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विकासकामे, केंद्र-राज्य समन्वय आणि आगामी काळातील विकासाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – UPI Transactions Free : युपीआय व्यवहारांवर आता खरंच शुल्क भरावं लागणार का?)

यावेळी त्यांनी संसदेतील विरोधकांच्या भूमिकेवरही टीका केली. सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार असतानाही विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांपेक्षा राजकीय भूमिका मांडण्यातच विरोधक अधिक रस घेत असल्याचेही त्यांनी म्हटले. (DCM Eknath Shinde)

एनडीएमध्ये सहभागी झालेल्या नव्या आणि तरुण खासदारांबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाचे कौतुक केले. विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेत तरुण खासदारांची महत्त्वाची भूमिका असेल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान स्वतः पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. (DCM Eknath Shinde)

(हेही वाचा – India Food Processing Business : भारताला ११० अब्ज अमेरिकन डॉलरच्या अन्न प्रक्रिया निर्यातीची संधी)

बैठकीनंतर आणखी एका प्रसंगाचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. संवादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या संवादातून दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा आहे. (DCM Eknath Shinde)

दरम्यान, संसद भवनात जवळपास ६० मिनिटे झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून चहासाठी बोलावले होते. त्या भेटीत महाराष्ट्रातील विकासकामे, विविध समकालीन विषय आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. तसेच नव्या खासदारांशी संवाद साधून त्यांना ‘विकसित भारत २०४७’च्या ध्येयासाठी काम करण्याचा संदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. (DCM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.