Thailand School Shooting : शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून बेछूट गोळीबार; 3 शिक्षकांसह 3 विद्यार्थ्यांचाही मृत्यू

82
Thailand School Shooting
थायलंडमध्ये शाळेत थरारक गोळीबार (AI Image)

Thailand School Shooting : थायलंडची राजधानी बँकॉकजवळील एका शाळेत शुक्रवारी झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने, संपूर्ण देश हादरला आहे. एका विद्यार्थ्याने शाळेत बेछूट गोळीबार केल्याने तीन शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू असून, 20 ते 30 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेत जाण्यापूर्वी या विद्यार्थ्याने स्वतःच्या आजी-आजोबांचीही हत्या केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

स्थानिक वृत्तांनुसार, बँकॉकच्या उत्तरेला असलेल्या नोंथाबुरी प्रांतातील डेबसिरिन नोंथाबुरी स्कूलमध्ये हा गोळीबार झाला. सुमारे 3,000 विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्याने अचानक गोळीबार सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी वर्गखोल्या तसेच इतर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. (Thailand School Shooting)

हेही वाचा: American Citizenship Rules : जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांची पुन्हा कडक भूमिका, नवे कार्यकारी आदेश लागू

दरम्यान, गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचे पुढे नेमके काय झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तांनुसार, पोलिसांच्या कारवाईत तो ठार झाला किंवा त्याने आत्महत्या केली. तर इतर काही अहवालांमध्ये त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. (Thailand School Shooting)

हत्यारांची मोठी उपलब्धता चिंतेचा विषय

स्थानिक अहवालांनुसार, ही घटना ज्या परिसरात घडली तो भाग बेकायदेशीर आणि कायदेशीर शस्त्रांच्या उपलब्धतेसाठी ओळखला जातो. या परिसरात सुमारे एक कोटी बंदुका असल्याचा अंदाज असून, सरासरी प्रत्येक सात नागरिकांमागे एक बंदूक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शस्त्रसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Thailand School Shooting)

हेही वाचा: Meta ला अमेरिकन न्यायालयाचा मोठा दणका! ठोठावला ५ हजार कोटींचा दंड; बालहक्कांची पायमल्ली केल्याप्रकरणी कारवाई

थायलंडमध्ये शस्त्रांवरील नियंत्रण अधिक कडक करण्याच्या घोषणा अनेकदा करण्यात आल्या असल्या, तरी अशा घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी 2022 मध्ये एका बालवाडीत झालेल्या भीषण हल्ल्यात 24 लहान मुलांसह एकूण 36 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही देशात शस्त्रनियंत्रणाच्या कायद्यांवर मोठी चर्चा झाली होती. (Thailand School Shooting)

हेही पाहा: 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.