आडवाटेवरचा महाराष्ट्र : Chimaji Appa पेशव्यांच्या पराक्रमाचे तीन साक्षीदार

257

महाराष्ट्राच्या इतिहासात गड-दुर्गांचे (Maharashtra Forts) महत्त्व अनन्यसाधारण आहे. भुईकोट, जलदुर्ग, गिरीदुर्ग यांसारखे दुर्ग महाराष्ट्रात खूप आहेत. अगदी देशाची आर्थिक राजधानी म्हणवणाऱ्या मुंबईपासून ते गडचिरोलीच्या जंगलातील सुरजागड किल्ल्यापर्यंत विविध प्रकारच्या किल्ल्यांची माळच जणू महाराष्ट्रात आहे. यामध्ये सातवाहन राजघराण्यापासून, यादव, शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य, मुसलमानी सुलतानी सत्ता, मराठे, इंग्रज,डच आणि पोर्तुगीज या सर्वांनीच महाराष्ट्राच्या दुर्गबांधणीत आपापले योगदान दिले आहे. यातील अनेक किल्ले आपल्याला माहिती आहेत. त्या किल्ल्यांवर आपण गेले देखील असाल. प्रत्येक भागातील इतिहास वेगळा आहे, तेथील किल्ल्यांनी त्यामध्ये आपले योगदान दिले आहे. यातीलच उत्तर कोकणच्या इतिहासाची आज चर्चा करु. उत्तर कोकणचा इतिहास (Konkan History) हा वेगवेगळ्या राजवटींच्या योगदानाने समृद्ध झाला आहे. गुजरातच्या सुलतानापासून ते मराठ्यांपर्यंत हा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. याच उत्तर कोकणच्या इतिहासाचे अनेक मूक साक्षीदार अरबी समुद्राकडे तोंड करुन उभे आहेत. यामधील पोर्तुगीजांचा बळकट वसईचा दुर्ग आपल्याला माहिती आहे. परंतु या किल्ल्याच्या खाली आणि उत्तरेला काही बळकट परंतु आता पूर्णपणे दुर्लक्षित असे तीन किल्ले आहेत. आडवाटेवरचा महाराष्ट्र या मालिकेतील आजच्या भागात याच तीन किल्ल्यांची चर्चा. (Chimaji Appa)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.