BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले

निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची गच्छंती आता अटळ मानली जातेय.

115
BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले
BCCI Selectors Controversy : अजित आगरकर यांनी घेतलेले ४ निर्णय जे वादग्रस्त ठरले
  • ऋजुता लुकतुके

BCCI Selectors Controversy : बीसीसीआयच्या पुरुषा संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ आता संपण्याच्या दिशेने जात असताना, त्यांच्या निवड धोरणावर आणि काही महत्त्वाच्या निर्णयांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाने त्यांच्या कार्यकाळात आयसीसी स्पर्धांमध्ये यश मिळवले असले, तरी काही निर्णयांमुळे निवड समितीवर सातत्याने टीका होत राहिली आहे. सुरुवातीला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत (ODI World Cup) त्यांना मुदतवाढ मिळेल अशी चिन्हं होती. पण, अचानक आतल्या गोटातील वाद वाढत गेले आणि आता मुदत संपल्यावर त्यांची गच्छंती अटळ मानली जातेय.

आगरकर यांनी २०२३ मध्ये निवड समिती अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर भारतीय संघाने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र खेळाडूंची निवड, कर्णधारपदातील बदल, अनुभवी खेळाडूंना वगळण्याचे निर्णय आणि दुखापत व्यवस्थापन या मुद्द्यांवर त्यांना अनेकदा कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागले.

सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या निर्णयांमध्ये मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) कसोटी पुनरागमनाला विलंब, काही मालिकांमध्ये रोहीत शर्मा (Rohit Sharma) आणि इतर वरिष्ठ खेळाडूंबाबत घेतलेली भूमिका, तसेच संघातील सातत्याचा अभाव या बाबींचा उल्लेख केला जात आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी निवड प्रक्रियेत स्पष्टता आणि संवादाचा अभाव असल्याची टीकाही केली आहे.

(हेही वाचा – Agni-4 Missile : भारताची नवी संरक्षण झेप! ‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; जाणून घ्या वैशिष्ट्ये)

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समिती यांच्यातील समन्वयाबाबतही विविध अहवालांमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले. संघ निवड आणि दीर्घकालीन नियोजन यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चांनीही आगरकर यांच्या कार्यकाळावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

तथापि, आगरकर यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, भारतीय क्रिकेट संक्रमणाच्या टप्प्यात होते आणि युवा खेळाडूंना संधी देणे, पुढील विश्वचषक चक्र लक्षात घेऊन संघबांधणी करणे आणि भविष्यासाठी संघ तयार करणे ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अनेक कठीण निर्णय दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून घेण्यात आल्याचे त्यांचे मत आहे.

आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत अंतिम निर्णय BCCI घेणार असला, तरी त्यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने भारतीय क्रिकेटला यश आणि वाद दोन्ही दिले, अशीच सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. आगामी महिन्यांत त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर निवड समितीच्या भवितव्याबाबत BCCI महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.