Vishwesh Negi यांची Iran मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती; मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

Vishwesh Negi यांची Iran मध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती; मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

174
Vishwesh Negi Ambassador to Iran
Vishwesh Negi Ambassador to Iran

Vishwesh Negi Ambassador to Iran : भारत सरकारने २००२ च्या तुकडीचे आयएफएस (IFS) अधिकारी विश्वेश नेगी यांची इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (Joint Secretary) म्हणून कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, विश्वेश नेगी हे लवकरच इराणमधील भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारतील.

(हेही वाचा: Satara DCC Bank Election : एका मतासाठी दोन लाखांची बोली; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?)

दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी जहाजांवरील हल्ले टाळण्याचे आवाहन केले. तसेच भारताने संवाद आणि राजनैतिक मार्गानेच संकट सोडवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

(हेही वाचा: “दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता…”; इराणसोबतच्या वाटाघाटीदरम्यान Donald Trump यांचं मोठं विधान!)

संघर्षाऐवजी चर्चेला प्राधान्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना इराणवर भीषण हल्ला करण्याचा विचार केला होता, मात्र सौदीच्या मध्यस्थीनंतर ही कारवाई स्थगित केल्याचे सांगितले. पुढे बोलताना इराणबरोबर आजपासून पुन्हा चर्चा सुरु होणार असून संघर्षाऐवजी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याला आपलं प्राधान्य असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.