Motor Vehicles Act : राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘पोलिसांचे बोधचिन्ह’ किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी अथवा चिन्हे लावल्याचे आढळल्यास, संबंधित वाहनांवर आता मोटार वाहन अधिनियम, 1988 (Motor Vehicles Act) आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तक्रारीनंतर RTOचा मोठा निर्णय
पत्रकार विकी जाधव यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ तसेच पोलीस बोधचिन्ह वापरले जात असल्याची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत RTO प्रशासनाने संबंधित वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (Motor Vehicles Act)
RTOच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक तसेच सहा मोटार वाहन निरीक्षक तपासणीदरम्यान अशा वाहनांची पाहणी करणार आहेत. खासगी वाहनांवर ‘पोलीस’, पोलीस बोधचिन्ह किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी अथवा चिन्हे आढळल्यास मोटार वाहन अधिनियम, 1988 मधील तरतुदीनुसार संबंधित वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ. गिरी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’, पोलीस बोधचिन्ह किंवा ‘महाराष्ट्र शासन’ अशी ओळख दर्शविणारी पाटी लावलेली आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच, करण्यात आलेल्या प्रत्येक कारवाईचा अहवाल खटला विभागाकडे नियमितपणे सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. (Motor Vehicles Act)
नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर
या निर्णयामुळे राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी ओळख दर्शविणारे शब्द किंवा बोधचिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली असून, संबंधित नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. (Motor Vehicles Act)
दरम्यान, पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनीही शासकीय वाहनांवरील अनधिकृत दिवे आणि ओळखचिन्हांविरोधात मोहीम सुरू केली आहे. मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील अनधिकृत दिवे काढून संबंधितांना नोटिसा बजावल्या जात आहेत. ज्यांना दिवा वापरण्याची अधिकृत परवानगी नाही, अशा वाहनांवर दिवा लावलेला आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा: Maharashtra SDRF : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदतीचा हात; महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी?
मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून मंत्रालयात येणाऱ्या तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी केली जात असून, जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सचिवांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील अनधिकृत दिवे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. (Motor Vehicles Act)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


