Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर, बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया

जवळपास तीन वर्षे सुरू असलेल्या या बहुचर्चित प्रकरणानंर अखेर सोमवारी न्यायालयाकडून हा अंतिम निर्णय देण्यात आला

109
Brij Bhushan Singh Case
दिल्ली न्यायालयाकडून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता

Brij Bhushan Singh : दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या बहुचर्चित लैंगिक छळ प्रकरणात माजी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह तसेच माजी सहायक सचिव विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारी अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी (ACJM) अश्विनी पंवार यांनी हा निकाल सुनावला. जवळपास तीन वर्षे सुरू असलेल्या या बहुचर्चित प्रकरणानंर अखेर आज न्यायालयाकडून हा अंतिम निर्णय देण्यात आला

न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण सुनावणीचा विचार केल्यानंतर आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे नसल्याचे नमूद करत दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 2 जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता आणि 3 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला. (Brij Bhushan Singh)

हेही वाचा: Commonwealth Games 2026 Medal Tally : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, ३९ पदकांसह चौथं स्थान

प्रकरणाची पार्श्वभूमी

2023 मध्ये भारतातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, धमकावणे आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन झाले होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता.

बृजभूषण यांच्यावर काय आरोप होते?

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिलांचा विनयभंग, लैंगिक छळ, पाठलाग (स्टॉकिंग) आणि गुन्हेगारी धमकीसह भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली आरोप ठेवले होते. विनोद तोमर यांच्यावरही धमकी दिल्याचा आणि कथित गुन्ह्यात सहकार्य केल्याचा आरोप होता. न्यायालयाने यापूर्वी या आरोपांवर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींनी सर्व आरोप फेटाळून लावत स्वतःला निर्दोष असल्याचा दावा केला होता. (Brij Bhushan Singh)

निकालानंतर बृजभूषण यांची प्रतिक्रिया

दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता जाहीर केल्यानंतर, बृजभूषण शरण सिंह यांनी हा निर्णय समाधानकारक असल्याचे सांगत न्यायव्यवस्थेवर आपला सुरुवातीपासूनच पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “आजचा दिवस आनंदाचा आहे. मला सुरुवातीपासून विश्वास होता की न्याय मिळेल. मी कधीच स्वतःला दोषी मानले नव्हते,” असे सांगितले.

हेही वाचा:  Mumbai Water Supply : मुंबईकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर संपणार? पाणीकपातीबाबत मोठा निर्णय लवकरच

 त्यावेळी बृजभूषण महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामुळे भारतीय कुस्ती महासंघाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणामुळे देशभरात खेळाडूंची सुरक्षा, क्रीडा संघटनांमधील उत्तरदायित्व आणि महिलांवरील लैंगिक छळाच्या तक्रारींच्या हाताळणीवर व्यापक चर्चा झाली होती. आता न्यायालयाच्या निकालानंतर या प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेचा महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे. (Brij Bhushan Singh)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.