-
ऋजुता लुकतुके
ग्लासगो येथे झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत(Commonwealth Games 2026)रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय मुष्टियोद्धा लवलिना बोर्गोहेनने आपले पदक आसाममधील पूरग्रस्त जनतेला अर्पण करत संवेदनशीलतेचं उदाहरण घालून दिलं. आपल्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी राज्यातील हजारो पूरबाधित कुटुंबांच्या वेदनांशी एकरूप होत तिने ही भावना व्यक्त केली. तिच्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे.(Commonwealth Games 2026)
महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात लवलिनाला ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-स्यू ग्रीनट्रीकडून १-४ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत सुवर्णपदक हुकले असले, तरी संपूर्ण स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करत भारताला महत्त्वाचे पदक मिळवून दिले.(Commonwealth Games 2026)
सामन्यानंतर लवलिनाने सांगितले की, हे पदक मी आसाममधील पूरग्रस्त बांधवांना समर्पित करते. त्यांच्या वेदना मला सतत जाणवत होत्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांनी आपली घरे, शेती आणि उपजीविकेची साधने गमावली आहेत. माझे हे यश त्यांच्या संघर्षाला समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.(Commonwealth Games 2026)
(हेही वाचा – Maharashtra SDRF : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदतीचा हात; महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी? )
आसाममध्ये अलीकडे पुरामुळे हजारो लोक विस्थापित झाले असून अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. लवलिना स्वतः आसामची असल्याने या संकटाचा परिणाम तिच्या मनावर झाला होता. तिच्या या विधानामुळे गोलाघाट जिल्ह्यासह संपूर्ण आसाममध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.(Commonwealth Games 2026)
लवलिनाने आपल्या प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि भारतीय संघाचेही आभार मानले. सुवर्णपदक न मिळाल्याची खंत असली, तरी भविष्यात अधिक मेहनत घेऊन भारतासाठी मोठे यश मिळवण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. तिच्या या भावनिक कृतीमुळे तिचे व्यक्तिमत्त्व केवळ यशस्वी खेळाडू म्हणून नव्हे, तर समाजाशी नाळ जपणारी संवेदनशील नागरिक म्हणूनही अधोरेखित झाले आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचा नकाशा प्रसारित झाला, त्यात ईशान्य भारत दाखवला नसल्याची चूकही लवलिनानेच सुरुवातीला उघडपणे दाखवली होती. आणि त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. (Commonwealth Games 2026)
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सात सुवर्ण आणि तीन रौप्यपदके जिंकली. या यशात लवलिना बोर्गोहेनच्या रौप्यपदकाचाही महत्त्वाचा वाटा आहे. तिच्या पदक अर्पण करण्याच्या निर्णयाने क्रीडा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे. तिच्या या कृतीने अनेकांच्या मनाला स्पर्श केला असून, संकटाच्या काळात समाजाप्रती जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे.(Commonwealth Games 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

