-
ऋजुता लुकतुके
ग्लासगो येथे झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या(Commonwealth Games 2026)समारोपानंतर २०३० राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद अधिकृतपणे भारताकडे सोपवण्यात आले. त्यानंतर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी अहमदाबादमध्ये जागतिक दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला. २०३० मध्ये होणारी राष्ट्रकुल स्पर्धा ही स्पर्धेची शताब्दी आवृत्ती असल्याने भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.(Commonwealth Games 2026)
ग्लासगो येथे भारतीय प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून उपस्थित असलेल्या संघवी यांनी सांगितले की, अहमदाबाद जगभरातील खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि क्रीडाप्रेमींचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आधुनिक क्रीडांगणे, प्रशिक्षण केंद्रे, वाहतूक व्यवस्था, निवास सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जात आहे. भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा आयोजनाची क्षमता दाखवून देण्याची ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.(Commonwealth Games 2026)
(हेही वाचा – Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेचा दिमाखदार समारोप, २०३० साठी बॅटन भारताकडे )
संघवी म्हणाले की, गुजरात सरकार दीर्घकालीन दृष्टीकोनातून क्रीडा सुविधा विकसित करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह, नरेंद्र मोदी स्टेडियम आणि इतर आधुनिक क्रीडा संकुलांच्या विकासामुळे अहमदाबाद आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. अनेक सुविधा आधीच उपलब्ध असून उर्वरित प्रकल्पांचे कामही वेगाने सुरू आहे.(Commonwealth Games 2026)
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख करत संघवी यांनी सांगितले की, या यशामुळे देशात क्रीडाविकासाला नवी चालना मिळाली आहे. आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.(Commonwealth Games 2026)
२०३० मध्ये अहमदाबाद येथे होणारी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आयोजित होणारी दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असेल. या आयोजनामुळे गुजरात आणि भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळेल, असा विश्वास संघवी यांनी व्यक्त केला. गुजरात सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि विविध क्रीडा संस्थांच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Commonwealth Games 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

