पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. बर्धमान येथून अटक करण्यात आलेला ‘जैश-ए-मोहम्मद’ (Jaish-e-Mohammed) या संघटनेचा संशयित दहशतवादी हमीम मंडल याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याची अत्यंत जवळची सहकारी आणि प्रेयसी अर्पिता सरकार (Arpita Sarkar) हिला झारखंडमधील साहिबगंज येथून ताब्यात घेतले आहे. अर्पिता ही या संपूर्ण नेटवर्कमध्ये प्रभावशाली राजकीय नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करत होती. (Arpita Sarkar)
(हेही वाचा – POK मधील हिंसाचार पोहचला लाहोरपर्यंत; पोलिसांनी आंदोलकांवर केली कारवाई)
एनक्रिप्टेड ॲप आणि राजकीय नेत्यांवर पाळत
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता सरकार आणि हमीम मंडल (Hamim Mandal) हे दोघेही एका विशेष सांकेतिक भ्रमणध्वनी संचलनाचा (Encrypted App) वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी म्होरक्यांच्या संपर्कात होते. या दोघांच्या भ्रमणध्वनीची कसून तपासणी केली असता, अनेक धक्कादायक संदेश आणि संभाषणे हस्तगत करण्यात आली आहेत. हमीमचे मुख्य काम प्रमुख राजकीय नेत्यांच्या हालचालींवर आणि ताफ्यावर पाळत ठेवणे हे होते, तर अर्पिता ही विविध व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अत्यंत गोपनीय माहिती काढून घेण्याचे काम पाहत होती. (West Bengal STF Action)
पाकिस्तान जोडणी आणि मोठी चौकशी
या संपूर्ण कटाचे धागेदोरे सीमेपलीकडून हलवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या नेटवर्कला पाकिस्तानातून निधी आणि मार्गदर्शक सूचना मिळत होत्या. पोलीस कोठडीत असलेल्या अर्पिताची तिचे डिजिटल साहित्य, संगणकीय उपकरणे आणि इतर संपर्कांची कसून चौकशी सुरू आहे. या मोहिमेमुळे राज्यातील संभाव्य घातपाती कारवाया आणि मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेला असणारा धोका वेळेत टळला असून, या जाळ्यात आणखी कोण-कोण सहभागी आहेत याचा सखोल तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

