भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील बायो बदलल्यापासून चर्चेत आहेत. राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल तर्कवितर्क लढवले गेले. आपण आता फक्त ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी’ असा उल्लेख त्यांनी आपल्या एक्सच्या बायोमध्ये केला आहे. या सगळ्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान मोदींसाठी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हणणाऱ्यांवर उपरोधिक टीका करत शहजाद पूनावाला यांनी मोदींच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.(Shehzad Poonawalla Slams Rahul Gandhi)
हुकूमशाही गाजवण्यात मोदी सपशेल अपयशी ठरले
दिल्लीच्या जंतर-मंतरवर नुकतेच जेन-झी विद्यार्थ्यांचे आंदोलन पार पडले. जेन-झींनी उपरोधिक, मीम्सच्या भाषेत केंद्र सरकारवर टीका केली होती. याच शैलीचा अवलंब करत पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. “विरोधक पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हणतात, पण गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदी हे हुकूमशाही गाजवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, कारण ते शिक्षा करण्याऐवजी माफ करतात त्यांना काँग्रेसच्या काळात झालेली हुकूमशाही अवलंबता आली नाही”, असा टोला पूनावाला यांनी लगावला.(Shehzad Poonawalla Slams Rahul Gandhi)
PM @narendramodi YOU FAILED 😞
So disappointed ☹️
Never ever expected this.Watch the Truth till the end https://t.co/hE724ESB16 pic.twitter.com/CHOfRaq367
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) August 1, 2026
पूनावाला ३१ जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओचा संदर्भ देत म्हणाले, “काल रात्री पंतप्रधानांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःला, घटनात्मक पदांवरील व्यक्तींना आणि त्यांच्या आईला सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना ‘खोडकर मुले’ असे संबोधत त्यांना माफ केल्याचे सांगितले. एखादा हुकूमशहा असे करत नाही.”(Shehzad Poonawalla Slams Rahul Gandhi)
नेहरू-गांधी कुटुंबावर टीका
पूनावाला यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडून नव्हे, तर आपल्याच कुटुंबाच्या इतिहासातून खऱ्या हुकूमशाहीचा अर्थ समजून घ्यावा. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. खऱ्या हुकूमशाहीचे उदाहरण त्यांच्या इतिहासातच दडलेले आहे.” यासोबतच त्यांनी २०११-१२ मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. तसेच केरळ आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकारच्या काळात सोशल मीडिया पोस्ट आणि विद्यार्थी आंदोलनांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचाही संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. (Shehzad Poonawalla Slams Rahul Gandhi)
Join Our WhatsApp Community


