Railway Station : रेल्वे स्टेशन मास्तरांवर आता फलाटांवरील कुत्र्याची जबाबदारी 

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेत दिलेले निर्देश आणि रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकांवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास ‘आम्ही काय करणार,’ असे म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना हात वर करता येणार नाहीत. 

63
भटक्या कुत्र्याचा रेल्वे स्थानकावरचा दृश्य.
रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्याची उपस्थिती.
रेल्वे स्थानकांवरील (Railway Station) प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा कधी फलाटावर फेरफटका, कधी प्रतीक्षालयात, तिकीट खिडक्यांसमोर ठाण, तर कधी खाद्यपदार्थांच्या शोधात प्रवाशांच्या मागे लागणे, अशा प्रकारांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्याची जबाबदारी स्टेशन मास्तरांकडे सोपवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रत्येक स्थानकासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ३० जुलै रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, सर्व स्थानक अधीक्षक आणि स्टेशन मास्तर (प्रभारी) यांची भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला प्रतिबंध करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा आढळल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर निश्चित होणार आहे. (Railway Station)

(हेही वाचा “टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात…”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?)

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेत दिलेले निर्देश आणि रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकांवर भटक्या कुत्र्यांची तक्रार केल्यास ‘आम्ही काय करणार,’ असे म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना हात वर करता येणार नाहीत. (Railway Station) डॉग ड्युटी अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांना स्थानक परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त ठेवावा लागणार आहे. यासाठी संबंधित महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून भटक्या श्वानांचे व्यवस्थापन आणि आवश्यक कार्यवाही करावी लागणार आहे.

श्वान दिसल्यास कुणाला सांगणार?

रेल्वे स्थानकातील  (Railway Station) नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांक स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात भटका कुत्रा दिसल्यास प्रवाशांना संबंधित अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर त्वरित आणि जबाबदारीने कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.