सुरक्षित कल्याण-डोंबिवलीसाठी KDMC व पोलिसांचे संयुक्त पाऊल; सीसीटीव्ही नेटवर्क होणार हायटेक

महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न; २७ गावांसह टिटवाळा परिसरावरही लक्ष केंद्रित

70
KDMC and police officials in a meeting for safety measures.
सुरक्षित कल्याण-डोंबिवलीसाठी KDMC व पोलिसांचे संयुक्त पाऊल; सीसीटीव्ही नेटवर्क होणार हायटेक
  • कल्याण, प्रतिनिधी

KDMC             कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक गुरूवारी पार पडली. शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (KDMC)

या बैठकीला महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांच्यासह आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहूल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, उमेश बोरगावकर, कांचन कुलकर्णी, कुणाल पाटील, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त प्रसाद बोरकर, विराज लबडे, सुषमा मांडगे, तसेच पोलिस प्रशासनातील सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपन शिंदे, राजेंद्र खेडेकर, मुकेश ढगे, बळीरामसिंग परदेशी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (KDMC)

(हेही वाचा – Dombivli च्या ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चायनीज हॉटेल चालकासह ३ जण अटकेत)

या बैठकीत विशेषतः २७ गाव परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या भागात कायदा व सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी पोलिसांच्या गस्ती वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख व्यवस्था बळकट करणे, संशयित हालचालींवर सतत लक्ष ठेवणे आणि रहिवाशांच्या सहभागातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. (KDMC)

शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. नव्या डीपीआरनुसार आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे कल्याण-डोंबिवलीतील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. तसेच सध्या नादुरूस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करून त्यांना महापालिकेच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर ICCC आपत्कालीन कक्षाशी थेट जोडण्यात येणार आहेत. यामुळे शहरासह २७ गाव परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. (KDMC)

(हेही वाचा – अमली पदार्थ तस्करांशी लढणाऱ्या ‘ANTF’च्या खात्यात ३० टक्के प्रोत्साहन भत्ता)

शैक्षणिक संस्थांच्या परिसरातून पानाच्या टपऱ्यांचे उच्चाटन

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही बैठकीत प्राधान्याने घेण्यात आला. शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्या, तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (KDMC)

नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही

टिटवाळा परिसरातील गांजा, चरस, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी यांची विक्री तसेच सेवा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून विशेषतः २७ गाव परिसरासह संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी आणि ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असे महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी स्पष्ट केले. (KDMC)

(हेही वाचा – मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद! Highcourt चा संतप्त सवाल, अधिकाऱ्यांना पुन्हा तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश)

केडीएमसी-पोलिसांची सांगड

केडीएमसी आणि पोलिस प्रशासनाची सांगड झाली असून या दोन्ही प्रशासनांच्या संयुक्त प्रयत्नांतून शहरातील नादुरूस्त कॅमेरे दुरुस्त करणे, नवीन ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था करणे, २७ गाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि रहिवाशांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने लवकरच पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. (KDMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.