-
प्रतिनिधी
Fraud महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत काम मिळवून देण्याचे आणि ‘मुंबई टाईम्स फॅशन शो’मध्ये मॉडेलिंगची संधी देण्याचे मोठे प्रलोभन दाखवून एका ३३ वर्षीय तरुणाची ४७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. (Fraud)
(हेही वाचा – Hindusthan Post Impact : केडीएमटी प्रशासनाला जाग; डोंबिवलीत बस फेऱ्या वाढणार, ब्रेकडाऊन बसेसची तातडीने दुरुस्ती)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजीव आर. निर्मल (वय ३३, रा. वाळकेश्वर, मुंबई) यांच्यासोबत इन्स्टाग्राम आयडीवरून संपर्क साधणाऱ्या प्रशांत मजुमदार (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल, याने स्वतःची ओळख फॅशन डिझायनर म्हणून करून दिली. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना जुलै महिन्यात मुंबईत होणाऱ्या ‘मुंबई टाईम्स फॅशन शो’मध्ये प्रवेश आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत कल्याण ज्वेलर्सच्या टीव्ही जाहिरातीच्या चित्रीकरणात काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी १ लाख ते २.५ लाख रुपयांपर्यंत मानधन, कॅब सुविधा आणि २ दिवस राहण्याची व्यवस्था करण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले. (Fraud)
सुरक्षा रक्कम (Security Deposit), नोंदणी शुल्क (Registration Fee) आणि पोर्टफोलिओ शुल्काच्या नावाखाली आरोपीने फिर्यादीकडून वेगवेगळ्या यूपीआय (UPI) व्यवहारांद्वारे पैसे उकळले. २४ जानेवारी २०२५ रोजी खालीलप्रमाणे ५ ट्रान्झॅक्शन करण्यात आले.
पैसे घेतल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘टीम पेंडुलम प्रोडक्शन’च्या नावाने एक ईमेल पाठवून सुरक्षा रक्कम मिळाल्याची खोटी खात्री देण्यात आली. मात्र त्यानंतर कोणतेही काम न करता आरोपीने टाळाटाळ सुरू केली. पैशांचा परतावा मागितल्यावर आरोपीने फिर्यादीचा मोबाईल नंबर ब्लॉक केला तसेच इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲपवर पूर्णपणे संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने १९३० या सायबर हेल्पलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवली आणि अखेर मलबार हिल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

