-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli डोंबिवली जवळच्या ग्रामीण परिसरात राहणारी १६ वर्षीय मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या चायनीज हॉटेलच्या चालकासह तिघांना अटकेत मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक तिघांपैकी दोघेजण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. (Dombivli)
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. घरात वाद झाल्याने ती एका व्यक्तीसोबत घरातून निघून गेली होती. कटाई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या एका चायनीज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली असता तिच्याकडे पैसे नसल्याने हॉटेल चालकाने तिला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतले. त्यानंतर हॉटेल चालक अंगूर ठाकूर (२२) याने तिची ओळख परिसरातील दोन अल्पवयीन मुलांशी करून दिली. (Dombivli)
(हेही वाचा – Want to Work in the US : शिक्षणानंतर अमेरिकेत नोकरी करायची असेल तर भरावे लागणार इतके डॉलर? ट्रम्प यांचा नवीन डाव)
मुलीने आपली अडचण तिघांना सांगितली असता त्यांनी तिला नोकरीसह राहण्याची सोय करून देतो असे सांगून एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला रस्त्यावर सोडून पोबारा केला. पिडीत मुलगी चालत चालत कुळगाव-बदलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. तिची अवस्था पाहून स्थानिक रहिवाशांनी विचारपूस केली असता त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. जागरूक रहिवाशांनी मुलीला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. कुळगाव-बदलापूर पोलिसांनी या मुलीला मानपाडा पोलिसांच्या हवाली केले. (Dombivli)
दरम्यान घरातून निघून गेल्याने मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत मुलगी हीच असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान मुलीने तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी पोलिसांना सांगितली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांना पिडीत मुलीला धीर देत त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या तिन्ही बदमाशांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. (Dombivli)
(हेही वाचा – US Iran War : अमेरिका, इराण संघर्षात फेब्रुवारीपासून १६ भारतीयांचा मृत्यू; संसदेत माहिती)
पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन तिन्ही बलात्कारी आरोपींना ताब्यात घेतले. यापैकी अंगूर ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

