Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय ? 

147
Various gold jewelry displayed in a showcase.
A stunning display of intricate gold jewelry.

सोनं (Gold) आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी समोर आली आहे. जून महिन्याच्या प्रारंभापासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. काही दिवसांपूर्वी किमती वाढल्या असल्या, तरीही आता बहुप्रतिक्षित घसरण पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या नवीन दरपत्रकानुसार सोन्याच्या आणि चांदीच्या भावात (Silver Price) मोठी घसरण नोंदवली गेली असून, यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (Gold Rate Today)

(हेही वाचा – ‘मातोश्री’च्या दारात ‘हिंदू गब्बर’ची एन्ट्री! खासदारांच्या बंडानंतर Nitesh Rane यांच्या समर्थकांची थेट बॅनरबाजी)

अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शांततेच्या करारानंतर जागतिक बाजारात बदल होताना पाहायला मिळत आहे. युद्धाच्या दिवसांमध्ये महागाई वाढत चालली होती. तर त्याचा परिणाम आता सोन्याच्या किंमतींवरही होत होत होता. पण अमेरिका – इराणच्या शांततेच्या करारानंतर सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी २३ जूनला अनेक शहरांमध्ये सोनं-चांदीच्या किंमतीत (Today Gold Silver Rate) घट झालेली पाहायला मिळतेय.

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव

मुंबईत २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,५९१ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१६,७२८ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४५,९१० रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,३७५ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,०७,००० रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३३,७५० रुपये आहे.

मुंबईत आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०,९४४ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८७,५५२ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,०९,४४० रुपये आहे.

मुंबई, पुणे, कोलकाता, बंगलोर, केरळ या शहरांमध्ये सारख्या किंमती आहेत. तर दिल्लीमध्ये २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,६०६ आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅमची किंमत १३,३९० रुपये आहे. तर १८ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ११,३४० रुपये आहे.

(हेही पहा – Ben Stokes : नाईट क्लब प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यावर बेन स्टोक्स पुन्हा इंग्लंडचा कर्णधार)

चांदीचा आजचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मंगळवारी महाराष्ट्रासह दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो ५ हजार रुपयांनी कमी होऊन २,४५,००० रुपयांवर आला. तसेच जून महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात ४५,००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.