‘मातोश्री’च्या दारात ‘हिंदू गब्बर’ची एन्ट्री! खासदारांच्या बंडानंतर Nitesh Rane यांच्या समर्थकांची थेट बॅनरबाजी

91
बॅनरवर नितेश राणे यांचा उल्लेख 'हिंदू गब्बर' म्हणून.
नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर लावले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून सोमवारी शिवसेना उबाठा गटातील सहा लोकसभा खासदारांनी अधिकृतपणे सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या चार वर्षांतील हा दुसरा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या मोठ्या पडझडीनंतर आता विरोधकांकडून उबाठा गटाला आणखी डिवचले जात आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर समर्थकांनी मोठे बॅनर लावले आहेत. या फलकांवर नितेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे.  (Nitesh Rane)

(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू)

‘मातोश्री’बाहेरील बॅनरवर हिंदू गब्बरची चर्चा 
मातोश्री बाहेर मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागले आहेत. त्या बॅनर वर हिंदू गब्बर (Nitesh Rane Hindu Gabbar ) असा उल्लेख करण्यात आला आहे. खासदार फुटीनंतर आणि वाढदिवसाच्या निमित्ताने राणे समर्थकांनी उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर मातोश्री  बाहेर लावले आहे. मयूर बागोरिया यांच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरवर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची फोटो आहेत. गेल्या वर्षी देखील या परिसरात अशाच प्रकारे ‘हिंदूरक्षक’ असे बॅनर लावून ठाकरेंना आव्हान देण्यात आले होते. मात्र, यंदा खासदारांच्या पक्षांतराची पार्श्वभूमी असल्यामुळे या बॅनरची चर्चा अधिक रंगली आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nitesh Rane)

(हेही वाचा – Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल वधारलं; तुमच्या शहरातील इंधनाचे नवे दर पहा एका क्लिकवर!)

ऑपरेशन टायगर सफल ?
‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger Successful) अंतर्गत सहा खासदारांना आपल्या गोटात सामील करून घेतल्यावर आता येत्या काही दिवसांत उबाठा गटातील अनेक आमदार आणि मुंबईतील माजी नगरसेवकही सत्ताधारी पक्षात येतील, असा दावा केला जात आहे. या राजकीय भूकंपामुळे शिवसेना उबाठाच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली होती, परंतु या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता उद्धव ठाकरे स्वतः या सहाही खासदारांच्या मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.