IND vs AFG 2nd ODI : शुभमन गिलने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत केले शतक; ईशान किशननेही केल्या शंभर धावा

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या डावात षटकार मारताच रोहितने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४००० धावा पूर्ण केल्या.

114
शुभमन गिलने शतक साजरा करताना
शुभमन गिलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक साजरा केला.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs AFG 2nd ODI) १७ जून रोजी लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या डावात षटकार मारताच रोहितने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४००० धावा पूर्ण केल्या. शुभमन गिलने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत ७७ चेंडूत शतक केले. ईशान किशननेही ७० चेंडूत १०० धावा केल्या. (IND vs AFG 2nd ODI)

(हेही वाचा India Defence Production: भारताचा ‘आत्मनिर्भर’ संरक्षणात नवा रेकॉर्ड! संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींच्या ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर

टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. पण त्याच्या फलंदाजीतील धार काही कमी झालेली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात (IND vs AFG 2nd ODI) त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं होतं. या सामन्यातही त्याने दमदार सुरुवात केली. पण त्याला ४८ धावांवर माघारी परतावं लागलं आहे. राशिद खानने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर रोहितची दांडी गुल झाली. त्यामुळे त्याचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. आधी चौकार आणि मग षटकार खेचून त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामिगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. यावेळी शुभमन गिलने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत ७७ चेंडूत शतक केले. ईशान किशननेही ७० चेंडूत १०० धावा केल्या. (IND vs AFG 2nd ODI)

भारताची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (सी), इशान किशन (डब्ल्यूके), श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन: रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), इब्राहिम झद्रान, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (सी), दरविश रसूली, रशीद खान, नांगेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम साफी, बिलाल सामी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.