Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच

Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच

90
Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच
Vidhan Parishad Election च्या तोंडावर राजकीय भूकंप; बंडखोर खासदाराच्या मुलाच्या उमेदवारीचा पेच
प्रतिनिधी

​राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या(Vidhan Parishad Election)मतदानासाठी अवघा एक दिवस उरला असतानाच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एका मोठ्या राजकीय धक्क्याला सामोरे जावे लागत आहे. पक्षाचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. या राजकीय उलथापालथीचा सर्वात मोठा फटका उद्या होणाऱ्या विधान परिषद मतदानाला बसण्याची चिन्हे आहेत.(Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Mumbai : शुक्रवारपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, वीजपुरवठा, बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता )

​विशेष म्हणजे, हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील-आष्टीकर हे विधान परिषदेच्या रिंगणात उमेदवार आहेत. या निवडणुकीत सुरुवातीला महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी त्यांना माघार घेण्यास भाग पाडून कृष्णा पाटील-आष्टीकर यांना मविआचा अधिकृत पाठिंबा मिळवून देण्यात आला होता. आता खुद्द खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनीच बंडाचे निशाण फडकवल्याने आणि ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याने, मविआने ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याच उमेदवाराच्या वडिलांनी पक्षात बंड केल्याने पेच निर्माण झाला आहे.(Vidhan Parishad Election)

​मराठवाड्यातील चारपैकी तीन मतदारसंघांतील खासदार बंडात सहभागी असल्याने या निवडणुकीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. खासदार संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर आणि नागेश पाटील-आष्टीकर यांच्या हालचालींनी महाविकास आघाडीची समीकरणे विस्कळीत केली आहेत. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्याच्या मतदानासाठी काय भूमिका घेणार आणि या उमेदवाराबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. फुटीच्या या नाट्यामुळे विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता कमालीचे गुंतागुंतीचे बनले आहे.(Vidhan Parishad Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.